Mumbai news : ‘एसआयआर’विरोधात राज-उद्धव ठाकरे एकत्र
Mumbai news : मुंबई, महाराष्ट्र मिरर : मतदार याद्यांच्या ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (एसआयआर) प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
1 मिनट पठन

Mumbai news : भायखळा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला महामोर्चा
Mumbai news : मुंबई, महाराष्ट्र मिरर : मतदार याद्यांच्या ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (एसआयआर) प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. एसआयआरविरोधात येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली. भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडासच्या आवारातून सुरू होणारा हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार असून, तेथे त्याचे सभेत रूपांतर होणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
दादर येथील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोर्चाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. एसआयआर प्रक्रियेमुळे मतदारांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. https://maharashtramirror.com/ Mumbai news
राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडासच्या आवारातून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा पुढे मुंबई महापालिका मुख्यालयाकडे रवाना होईल. मुख्यालयासमोर व्यासपीठ उभारण्यात येणार असून, तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.
‘मोर्चात पक्षांचे झेंडे नाहीत, केवळ तिरंगा’
एसआयआरचा मुद्दा हा कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकशाही, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संविधानाच्या रक्षणाशी संबंधित हा विषय असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. सहभागींनी हातात केवळ राष्ट्रध्वज घेऊन यावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले.
सर्वपक्षीय सहभागाचे आवाहन
महामोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येणार असल्याचेही दोन्ही नेत्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना सहभागी व्हायचे असल्यास त्यांचेही स्वागत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात विविध राजकीय पक्षांकडून स्वतंत्रपणे होणाऱ्या आंदोलनांवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. या आंदोलनांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून, निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जनजागृती करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या माध्यमातून एसआयआर प्रक्रियेविरोधातील आपली भूमिका व्यापक पातळीवर मांडण्याची तयारी ठाकरे बंधूंनी सुरू केली आहे.
