मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai news : निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 'एसआयआर' आणि मतदार नाव गायब प्रकरणाविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत भव्य मोर्चा

Mumbai news : मुंबई: निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर दोन आयुक्तांनी उपस्थित केलेले १४ गंभीर आक्षेप आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून कोट्यवधी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 'एसआयआर' आणि मतदार नाव गायब प्रकरणाविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत भव्य मोर्चा
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 'एसआयआर' आणि मतदार नाव गायब प्रकरणाविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत भव्य मोर्चा

Mumbai news : मुंबई: निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर दोन आयुक्तांनी उपस्थित केलेले १४ गंभीर आक्षेप आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून कोट्यवधी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
यापूर्वी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र येत ठाकरे बंधूंनी मुंबईत विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर आता थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. हा मोर्चा केवळ एका किंवा दोन राजकीय पक्षांपुरता मर्यादित न ठेवता, तो संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा आणि सामान्य जनतेचा प्रातिनिधिक आवाज ठरावा, यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

राज ठाकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट


मोर्चाची घोषणा करताना राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे:
"देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत, अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने काम केले आहे. ‘एसआयआर’ च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली गेली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक भव्य जनमोर्चा काढणार आहे."
मोर्चामागील मुख्य मुद्दे व पार्श्वभूमी
• निवडणूक आयुक्तांचे आक्षेप: निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवरच दोन आयुक्तांनी १४ गंभीर आक्षेप नोंदवल्याने आयोगाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
• मतदार यादीतून नावे गायब: 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रचंड संख्येने पात्र मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
• सर्वपक्षीय सहभागाचे आवाहन: लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि मतदारांच्या हक्कासाठी हा लढा असल्याने सर्व राजकीय घटकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें