Mumbai News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; यंदा शिवाजी पार्कवर दीपोत्सव होणार नाही, राज ठाकरेंची घोषणा
Mumbai News : मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा दिवाळीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
2 मिनट पठन

Mumbai News : मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा दिवाळीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने मोठ्या उत्साहात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा राज्यातील भीषण दुष्काळ आणि शेतकऱ्यांची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. एकीकडे दिवाळीच्या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे शेतकरी मात्र दुष्काळाच्या संकटामुळे हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करून दीपोत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
दरवर्षी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाला मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मैदानावर आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा साजरा केला जातो. मात्र, यंदा हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले.
१९७२ पेक्षाही भयानक दुष्काळाची शक्यता
राज ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळासंदर्भातील वक्तव्याचाही उल्लेख केला. १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळ राज्यात पडण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही सत्ताधारी पक्षातील लोकांना या संकटाचे गांभीर्य समजले नसल्याची टीका त्यांनी केली. राज्यात दुष्काळाचे सावट असताना काहीजण गरबा खेळण्यात मग्न असल्याचेही त्यांनी म्हटले.
रोषणाई आणि फटाक्यांवर आवर घालण्याचे आवाहन
दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीनिमित्त घराघरांत कंदील लावावेत, फराळ वाटावा आणि सणाचा आनंद जरूर घ्यावा. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणे आणि फटाके फोडणे या गोष्टींना आवर घालावा, अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे. शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना त्यांच्याप्रती संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवरील दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.दिवाळीचा उत्साह कायम ठेवत संकटात सापडलेल्या बळीराजाच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्याचा संदेश राज ठाकरे यांच्या या निर्णयातून देण्यात आला आहे.
