मुख्य सामग्री पर जाएँ

Rain update : खडकवासला धरणातून दुपारपासून विसर्ग वाढणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Rain update news : खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने मंगळवारी (दि.४) दुपारी १ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Rain update : खडकवासला धरणातून दुपारपासून विसर्ग वाढणार

मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे, महाराष्ट्र मिरर Rain update news : खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने मंगळवारी (दि.४) दुपारी १ वाजता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या विसर्गात ११,७०४ क्युसेकची वाढ करून एकूण विसर्ग १४,३९३ क्युसेक इतका करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग पुढे कमी किंवा वाढविण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.Rain update news

प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रात असलेले साहित्य, जनावरे किंवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.Rain update news

Rain update news

शेयर करें