मुख्य सामग्री पर जाएँ

Chandhighad News : पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का! दोन दिवसांत तीन आमदारांचा राजीनामा; तिन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Chandhighad News : चंदीगढ : पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आम आदमी पक्षाला (आप) मोठा राजकीय धक्का बसला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का! दोन दिवसांत तीन आमदारांचा राजीनामा; तिन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का! दोन दिवसांत तीन आमदारांचा राजीनामा; तिन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Chandhighad News : चंदीगढ : पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आम आदमी पक्षाला (आप) मोठा राजकीय धक्का बसला आहे. अवघ्या दोन दिवसांत पक्षाच्या तीन आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेhttps://maharashtramirror.com/ Chandhighad News

अमृतसर उत्तरचे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) पंजाब विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्यापूर्वी रविवारी (१ नोव्हेंबर) पतियाळा जिल्ह्यातील समाना मतदारसंघाचे आमदार चेतन सिंह जोडमाजरा आणि सनौरचे आमदार हरमीत सिंह पठाणमाजरा यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, या तिन्ही नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.https://maharashtramirror.com/ Chandhighad News

कुंवर विजय प्रताप सिंह यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा


अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंह संधवान यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी १ नोव्हेंबर २०२६ पासून विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

माजी आयपीएस अधिकारी असलेले कुंवर विजय प्रताप सिंह यांनी २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी मतभेद सुरू होते. त्यांनी अनेकदा सरकारच्या कामकाजावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

२०१५ च्या बेअदबी प्रकरणावरून सरकारवर टीका


२०१५ मधील बरगाडी बेअदबी प्रकरण आणि त्यासंबंधित पोलीस गोळीबाराच्या घटनांच्या तपासात न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबावरून कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब सरकारला वारंवार धारेवर धरले होते.

जानेवारी २०२३ मध्ये तपासासंदर्भातील मतभेदांमुळे त्यांनी विधानसभेच्या सरकारी आश्वासन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय राज्यातील अमली पदार्थांचे वाढते जाळे, गुन्हेगारी, खंडणी आणि गुंडगिरीच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. जून २०२५ मध्ये शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांच्या अटकेवर तसेच दक्षता विभागाच्या कारवाईवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या सातत्याने होत असलेल्या पक्षविरोधी वक्तव्यांमुळे आम आदमी पक्षाने २०२५ मध्ये त्यांना पाच वर्षांसाठी निलंबित केले होते.

रविवारी आणखी दोन आमदारांचे राजीनामे


कुंवर विजय प्रताप सिंह यांच्या राजीनाम्यापूर्वी रविवारी पतियाळा जिल्ह्यातील दोन आमदारांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकला होता. यामध्ये भगवंत मान सरकारमधील माजी मंत्री आणि समाना मतदारसंघाचे आमदार चेतन सिंह जोडमाजरा तसेच सनौर मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंह पठाणमाजरा यांचा समावेश आहे. दोघांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

विशेष म्हणजे, २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच या राजीनाम्यांची घटना घडली. मात्र, या पहिल्या यादीत समाना आणि सनौर या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती.

तीन आमदार भाजपच्या गोटात; ‘आप’समोर नवे राजकीय आव्हान

कुंवर विजय प्रताप सिंह, चेतन सिंह जोडमाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा या तिन्ही नेत्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील तीन आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या राजकीय घडामोडींचा आगामी निवडणुकीत काय परिणाम होणार, याकडे आता संपूर्ण पंजाबचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें