Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही….
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनट पठन

Pune Water Supply : पुण्यातील पाणी कपाल अखेर मागे; महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Water Supply : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने शहरात पुन्हा पाणी कपात लागू केली जाणार नाही, अशी घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Pune Water Supply no cuts
Crime News तेवीस वर्षानंतर हत्येचा उगवला सूड; चौघे अटकेत
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे झपाट्याने वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर ५० टक्के पाणी चार धरणांमध्ये होते. हा साठा कमी असला तरी खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडले जात असल्याने महापालिकेने पाणी कपात सुरू न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २२ जुलै रोजी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा नियमित आढावा घेण्यात आला. नागरिकांना नियमित वेळेनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचे यात स्पष्ट झाले. Pune Water Supply
View this post on Instagram A post shared by Manjusha Deepak Nagpure (@manjusha_deepak_nagpure)
तसेच आज (ता. २२) खडकवासला धरण प्रकल्पात आत्तापर्यंत २०.१६ टीएमसी (६९.१७ टक्के) पाणी जमा झाले आहे. अजूनही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात न करता नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महापौर नागपुरे यांनी घेतला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा, संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा महानगरपालिकेकडून नियमितपणे सखोल आढावा घेतला जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील सर्व पेठा, उपनगरे आणि नवीन वस्त्यांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना ठरलेल्या वेळेनुसार व पुरेसा पाणीपुरवठा मिळत असल्याची खात्री प्रशासनाकडून केली जात आहे. Pune Water Supply
मागील काही दिवसांत सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर शहरात पाणीकपात होणार असल्याबाबतच्या विविध चर्चा व अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व निव्वळ अफवा असून, नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांनी केले आहे. पाणीकपातीचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. Pune Water Supply

पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे. मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, पाझर नियंत्रण किंवा वीज पुरवठ्यात बिघाड यांसारख्या कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून युद्धपातळीवर दुरुस्तीचे कार्य केले जाते.

पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन
पाणीपुरवठा सुरळीत असला तरी, पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. भविष्यातील जलसंकटा टाळण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या दिवसांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि जबाबदारीने करावा, असे आवाहनही या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. वाहने धुणे, नळ उघडे सोडणे किंवा पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याचे सहकार्य नागरिकांनी करावे. Pune Water Supply
