मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुणेकरांना दिलासा! अधिकृत जीआरशिवाय पाणीकपात नाही

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यातील पाणीस्थिती, पावसाचे प्रमाण आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यभरात पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुणेकरांना दिलासा! अधिकृत जीआरशिवाय पाणीकपात नाही
पुणेकरांना दिलासा! अधिकृत जीआरशिवाय पाणीकपात नाही

Pune News : जलसंपदा विभागाच्या निर्णयानंतर महापालिकेची स्पष्ट भूमिका; आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यातील पाणीस्थिती, पावसाचे प्रमाण आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यभरात पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांसह पुणे महानगरपालिकेलाही लागू होणार आहे. मात्र, राज्य शासनाकडून अधिकृत लेखी शासन निर्णय (जीआर) प्राप्त होईपर्यंत पुणे शहरात पाणीकपातीबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे शहराला आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, सध्या धरणसाखळीतील पाणीसाठा जवळपास पूर्ण क्षमतेने आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे एक टीएमसी पाणीसाठा कमी असला, तरी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास हा साठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरवणे शक्य असल्याचे प्रशासनाचे मत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार १६ ऑक्टोबरपासून पाणी वापराचे नियोजन अधिक काटेकोरपणे राबविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, शासनाचा अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्ष पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव
उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेता आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सध्या पाणीकपात लागू केल्यास धरणांमधील पाणीसाठ्याचा वापर नियंत्रित पद्धतीने करता येईल आणि उन्हाळ्यात पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पुरेसा साठा राखून ठेवता येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राज्य सरकारकडून पाणीकपातीसंदर्भातील अधिकृत जीआर प्राप्त झाल्यानंतरच उपलब्ध पाणीसाठा, शहराची गरज आणि शासनाच्या निर्देशांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

महापौर-आयुक्तांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय
शासनाचा अधिकृत जीआर महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्यात संयुक्त बैठक घेऊन पाणीसाठा व पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर शहरातील पाणीकपातीची गरज, दिवस आणि वेळ निश्चित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

त्यामुळे सध्या पुणेकरांनी पाणीकपातीबाबत कोणतीही घाईघाईने चिंता करण्याची गरज नसून, शासनाचा अधिकृत आदेश आल्यानंतरच पाणीकपातीचे वेळापत्रक निश्चित होणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर, गळती रोखणे आणि पाणीवापराचे योग्य नियोजन यावर आगामी काळात महापालिकेचा भर राहणार आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें