मुख्य सामग्री पर जाएँ

Pune University : पुणे विद्यापीठात ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा

पुणे, महाराष्ट्र मिरर Pune University : जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा व संघर्षाचा सन्मान करण्यासाठी शनिवारी, दि.९ऑगस्ट रोजी हा दिवस जगभरात ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Pune University : पुणे विद्यापीठात ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा

पुणे, महाराष्ट्र मिरर Pune University : जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा व संघर्षाचा सन्मान करण्यासाठी शनिवारी, दि.९ऑगस्ट रोजी हा दिवस जगभरात ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमिवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाच्या वतीने विद्यापीठात जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.Pune University

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा गौरव करणाऱ्या स्फूर्तीदायी काव्यपंक्तींनी झाली. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे आणि विभागप्रमुख व संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांच्या हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.Pune University

या प्रसंगी अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजाचा ऐतिहासिक वारसा आणि बिरसा मुंडा यांचे विचार जपण्याचा संकल्प या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.Pune University

‘नामविस्तार दिन’ उत्साहात साजरा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यापीठाचा ‘नामविस्तार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे, अधिष्ठाता डॉ. सदानंद बनसोडे, डॉ. रावसाहेब लटपटे, डॉ. धनंजय मंडलिक, विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. विलास आढाव, क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे प्रमुख डॉ. अविनाश आडे यांसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune University

शेयर करें