Pune Sports News : विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन
पुणे, महाराष्ट्र मिरर Pune Sports News : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै.
1 मिनट पठन

कै. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै ते २२ ऑगस्टपर्यंत होणार स्पर्धा
पुणे, महाराष्ट्र मिरर Pune Sports News : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे २६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सवाचे हे २७ वे वर्षे आहे.Pune Sports News

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, माजी आमदार विनायक निम्हण हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत होते. आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत सलग २७ वर्षे माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.Pune Sports News
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे नगरसेवक निम्हण यांनी सांगितले.
खालील प्रकारात होणार क्रीडा स्पर्धा
या क्रीडा महोत्सवात सात क्रीडा प्रकार आहेत. यात खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा, राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा, जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा, जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा, जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा व जिल्हास्तरीय खुल्या निमंत्रित इनडोअर धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.Pune Sports News
स्पर्धेचे ठिकाण आणि एकूण बक्षिसे
या सातही क्रीडा स्पर्धेत साधारणतः दोन हजार स्पर्धक सहभागी होणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ८ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची रोख पारितोषिके तसेच प्रशस्तीपत्र आणिण पदक दिले जाणार आहेत. या सर्व स्पर्धा सनी वर्ड सुस रोड येथे होणार आहेत. स्पर्धकांनी नाव नोंदणी करिता ८३०८१२३५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.Pune Sports News
