मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Spa Sex Mastermind : स्पा मधील 'अनुज'चे धागेदोरे समोर : पुणे, ठाणे व्हाया मुंबई कनेक्शन !

कल्याणीनगर येथील नीरा स्पा कारवाईत 'अनुज'चे लागेबांधे : MPDA, Mcoca कारवाईची शक्यता ?

म
मुबारक

1 मिनट पठन

pune spa sex mastermind

  • कल्याणीनगर येथील नीरा स्पा कारवाईत 'अनुज'चे लागेबांधे : MPDA, Mcoca कारवाईची शक्यता ?
  • मुंबई/पुणे, दि. १३ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Spa Sex Mastermind :
    (मयुरेश गडकर विशेष प्रतिनिधी)

    पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पुण्यातील अवैध धंदे व स्पाच्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट मोडकीस आणण्यासाठी मोठी मोहीम आखण्यात आली आहे. आयुक्तांच्या मोहिमेला मोठं यश देखील मिळत आहे. स्पा सेक्स रॅकेटचा मास्टर माईंड 'अनुज'च कनेक्शन एका कारवाईत समोर आलं आहे. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर (Kalyani Nagar) येथे ‘निरा स्पा’ (Nira Spa) हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला होता या कारवाईत 'अनुज'चे लागेबांधे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘निरा स्पा’ (Nira Spa) या सेंटरवर पोलिसांनी धाडसी छापा टाकून दोन पिडीत महिलांची सुटका करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

    Pune Spa Sex Mastermind

    यापूर्वी पुण्यात हडपसर व इतर ठिकाणी या 'अनुज'च स्पा सेक्स रॅकेटच नेटवर्क पुणे पोलिसांनी मोडून काढलं होत. आता कल्याणीनगर येथील 'नीरा स्पा' कारवाईत पुन्हा 'अनुज'च नाव समोर येत असल्याने त्यावर MPDA कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

    शेयर करें