मुख्य सामग्री पर जाएँ

Pune : सिगारेट न दिल्याने टोळक्याकडून दुकानदारावर कोयत्याने हल्ला

Pune: Shopkeeper Attacked with Machete by Gang for Refusing to Provide Cigarettes

दज
दत्तात्रय जाधव

1 मिनट पठन

Pune: Shopkeeper Attacked with Machete by Gang for Refusing to Provide Cigarettes
Pune: Shopkeeper Attacked with Machete by Gang for Refusing to Provide Cigarettes

पुणे : दुकान उघडण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तिघांनी मिळून एका किराणा दुकानदाराला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) रात्री १ वाजण्याच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

या प्रकरणात विकास अरुण झिंजाडे (३२, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदल उर्फ चिकन्या हरिचंद वाल्मिकी (४०), आदित्य उर्फ लाल्या किसन जाधव (३२) आणि अजित उर्फ मद्री रामा पवार (३२, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य आणि अजितला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या दुकानासमोर येऊन सिगारेटची मागणी केली. फिर्यादीने दुकानाची चावी नसल्याचे सांगताच आरोपींनी चिडून जाऊन त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. यावेळी आरोपी उदल याने जवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Pune: Shopkeeper Attacked with Machete by Gang for Refusing to Provide Cigarettes

शेयर करें