मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : ससून रुग्णालयाजवळ मारहाण करून लुटले; दोघांना अटक

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील पीएमपीएमएल बसथांब्यावर थांबलेल्या व्यक्तीला मारहाण करून सात हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट लुटल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

ससून रुग्णालयाजवळ मारहाण करून लुटले; दोघांना अटक सात हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांची कारवाई**
ससून रुग्णालयाजवळ मारहाण करून लुटले; दोघांना अटक सात हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांची कारवाई**

Pune Crime : सात हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांची कारवाई**

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील पीएमपीएमएल बसथांब्यावर थांबलेल्या व्यक्तीला मारहाण करून सात हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट लुटल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

गोपाल हिराराम घारु (वय २२, रा. गणपती मंदिराजवळ, खराडी गावठाण) आणि नवदिप कुबेर भंडारी (वय १९, रा. श्री प्लाझा, पाटील बुवानगर, खराडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवार पेठेत राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

फिर्यादीनुसार, ते पुणे स्टेशन परिसरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील बसथांब्यावर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. पाकिटात सात हजार रुपयांची रोकड होती.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें