Pune News : खाजगी बसेसच्या मनमानी भाडे आकारणीवर आरटीओचा अंकुश विशेष तपासणी मोहीमेस सुरूवात
Pune News :पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एक विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.
1 मिनट पठन

Pune News :पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एक विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. २४ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खाजगी कंत्राटी बसेससाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सणाच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी बस धारकांकडून अवाजवी व जादा भाडे आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे हीमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आरटीओ प्रशासनाने कंत्राटी बसेसबाबत काही महत्त्वाचे नियम व निर्देश दिले आहेत https://maharashtramirror.com/ Pune News
खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारवयाचे कमाल भाडे आणि प्रति आसन दर दर्शवणारा तक्ता बस सुटण्याच्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
पथकाद्वारे बस वाहतूकदारांच्या बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन ऑनलाईन व ऑफलाईन आरक्षित तिकिटांचा तपशील तपासला जाईल, जेणेकरून आकारलेले भाडे विहित मर्यादेत असल्याची खात्री होईल.
सन २०१८ च्या शासन निर्णयानुसार, खाजगी कंत्राटी वाहनांचे कमाल भाडे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) त्याच संवर्गातील प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, याची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
या विशेष तपासणी मोहिमेमध्ये बसेसची सखोल तपासणी केली जाणार असून त्यात प्रामुख्याने विनापरवाना वाहन चालवणे, टप्पा वाहतूक, अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, आपत्कालीन निर्गमण दार, अग्निशमन यंत्रणा, पॅनीक बटन, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि जादा भाडे आकारणी यांसारख्या विविध बाबींची पडताळणी केली जाईल. या तपासणीदरम्यान नियमभंग किंवा दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
