Pune News : दिवाळीत खासगी बसची जादा भाडे आकारणी रोखण्यासाठी पुणे आरटीओची विशेष मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा!
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवाळ निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी मनमानी भाडेवाढ रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवाळ निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी मनमानी भाडेवाढ रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नियमानुसार खासगी कंत्राटी बसचे भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संबंधित संवर्गाच्या भाडेदराच्या दीडपटपेक्षा अधिक आकारता येत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात जादा भाडे आकारणीच्या तक्रारी वाढत असल्याने परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.२३ ऑक्टोबर रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बस असोसिएशनच्या २६ प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी वैध परवाना, चालकाचा बॅज, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, पीयूसी, वेगमर्यादा तसेच अग्निशामक यंत्रणा व प्रथमोपचार पेटीबाबत सूचना देण्यात आल्या.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ३० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार बसमधील कमाल भाडेदराचा तक्ता प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. स्वारगेट, हडपसर, वाघेश्वर पार्किंग, बालेवाडी, येरवडा, संगमवाडी आदी ठिकाणी तपासणी सुरू असून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी जादा भाडे आकारणीची तक्रार तिकिटाच्या फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
