मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : अनंत चतुर्दशीच्या शासकीय सुट्टीमुळे पुणे आरटीओकडून ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या तारखांमध्ये बदल

Pune News : पुणे: शासनाने शुक्रवारी अनंत चतुर्दशीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली होती .

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

अनंत चतुर्दशीच्या शासकीय सुट्टीमुळे पुणे आरटीओकडून ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या तारखांमध्ये बदल
अनंत चतुर्दशीच्या शासकीय सुट्टीमुळे पुणे आरटीओकडून ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या तारखांमध्ये बदल

Pune News : पुणे: शासनाने शुक्रवारी अनंत चतुर्दशीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली होती . या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांनी ऑनलाईन अपॉइंटमेंटबाबत नागरिकांच्या सुविधेसाठी महत्त्वाचा बदल केला असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या नागरिकांनी व वाहनधारकांनी अनुज्ञप्ती (लायसन्स) तसेच योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती, त्यांच्यासाठी सुधारित तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Maharashtra mirror

असे असेल सुधारित वेळापत्रक:


• दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण: २५ सप्टेंबर रोजीची अपॉइंटमेंट असलेल्या अर्जदारांचे कामकाज आता २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत केले जाईल.
• आळंदी रस्ता येथील अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण: या ठिकाणची २५ सप्टेंबरची अपॉइंटमेंट असलेल्या नागरिकांना २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुविधा उपलब्ध असेल.
• आयडीटीआर येथील अनुज्ञप्ती चाचणी: २५ सप्टेंबर रोजीची चाचणी आता २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडेल.
• संगम ब्रिज मुख्यालय येथील शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) चाचणी: २५ सप्टेंबर रोजीची अपॉइंटमेंट २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ग्राह्य धरली जाईल.
• मीटर पासिंगचे कामकाज: सर्व ठिकाणचे मीटर पासिंगचे काम २५ सप्टेंबर, २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर २०२६ या तिन्ही दिवशी पूर्णपणे बंद राहील.
आरटीओ प्रशासनाने सर्व संबंधित वाहनधारक आणि नागरिकांना या बदलाची नोंद घेऊन सुधारित तारखांनुसार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील अधिकृत वृत्तनिवेदन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्या वतीने प्रसिद्धीसाठी जारी करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें