Pune News : व्यावसायिकाची पैशाची बॅग लुटणारी टोळी जेरबंद;२४ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३० लाखांच्या मार्केटयार्ड दरोड्याचाही उलगडा
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
2 मिनट पठन

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी मार्केटयार्ड परिसरात व्यापाऱ्याच्या ३० लाख रुपयांच्या बॅगेवर दरोडा टाकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांशी संबंधित वाहने, मोबाईल, दागिने आणि रोख रकमेसह सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
व्यापाऱ्याच्या लुटी प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता फिर्यादी पाच लाख रुपये घेऊन जात असताना सॅलिसबरी पार्क येथील गोलीवाला भवन परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला. धारदार लोखंडी हत्याराने वार करून त्यांना जखमी केले आणि पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला..https://maharashtramirror.com/ Pune News
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळासह मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील सुमारे ३०० ते ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज महिनाभर तपासले. त्यातून संशयितांची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आला. त्यानंतर मुंढवा परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती दिली.
याप्रकरणी यश प्रविण सोनवणे (वय २४, रा. मांजरी रोड, मांजरी) आणि निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. राजगे आळी, मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी एक साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लाख रुपयांची बॅग लुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर यश सोनवणे आणि निहाल अडागळे यांनी अन्य साथीदारांसह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता मार्केटयार्ड रोडवर एका व्यापाऱ्याची ३० लाख रुपये रोख असलेली बॅग दरोडा टाकून चोरली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल आहे.
आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यांसाठी वापरलेली वाहने व कपडे, दोन मोबाईल, दरोड्यातील पैशांतून खरेदी केलेली एक आय-२० कार, एक बुलेट दुचाकी, अॅपल आयफोन १८ प्रो, साडेचार तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे तोडे, दोन अॅपल वॉच, एक महिलांचे घड्याळ आणि सहा लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसट आणि अन्य पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
