मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Rain : रेड अलर्टमुळे सिंहगड पर्यटकांसाठी बंद

Pune Rain : पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

1 मिनट पठन

Pune Rain

Pune Rain : सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी ६ व ७ जुलै रोजी पूर्णपणे बंद

Pune Rain : पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ६ आणि ७ जुलै रोजी रेड अलर्ट ( Pune Rain) जारी केल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसाचा इशारा आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी ६ व ७ जुलै रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. ( pune rain sinhagad ghat closed)

पुणे वनविभागाच्या ( Pune Rain) उपवनसंरक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सिंहगड घाट परिसर हा दरडप्रवण भाग असल्याने अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, दगड घसरणे, रस्त्यावर पाणी साचणे तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.( Pune Rain)

Maval : मावळ तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना; घरावर कोसळली दरड, एकाचा मृतदेह हाती

प्रशासनाने नागरिकांना रेड अलर्टच्या कालावधीत सिंहगडावर पर्यटनासाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच घाट परिसरात, दरडीच्या पायथ्याशी किंवा वेगाने वाहणाऱ्या ओढे-नाल्यांजवळ थांबू नये, पूरग्रस्त भाग ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि पोलीस, वनविभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Pune Rain)

Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!

याशिवाय, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ( Pune Rain)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले

शेयर करें