मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : खासगी बसचा प्रवास २० ते २५ टक्क्यांनी महागणार; पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचा निर्णय; शालेय बसची दरवाढही प्रस्तावित

Pune News : पुणे : वाहनांच्या किमती, डिझेल, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स, विमा, टोल आणि देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने खासगी बस आणि कारच्या भाडेदरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

खासगी बसचा प्रवास २० ते २५ टक्क्यांनी महागणार पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचा निर्णय; शालेय बसची दरवाढही प्रस्तावित
खासगी बसचा प्रवास २० ते २५ टक्क्यांनी महागणार पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचा निर्णय; शालेय बसची दरवाढही प्रस्तावित

Pune News : पुणे : वाहनांच्या किमती, डिझेल, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स, विमा, टोल आणि देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने खासगी बस आणि कारच्या भाडेदरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शालेय बस वाहतुकीच्या दरवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

जुनवणे म्हणाले, की संघटनेचे सुमारे १,४०० सभासद असून, त्यांच्यामार्फत पर्यटक बस, शालेय बस, कर्मचारी वाहतूक बस तसेच शैक्षणिक सहली, लग्नसमारंभ आणि धार्मिक यात्रांसाठीच्या बसेस चालविल्या जातात. मागील पाच वर्षांत भाडेदरात वाढ झालेली नाही. मात्र, या काळात वाहनांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या असून, इंधन आणि अन्य खर्चही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जुन्या दरांत सेवा देणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे.

संघटनेचे पदाधिकारी किरण देसाई यांनी शासनाकडून खासगी वाहतूकदारांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे सांगितले. परमिट, कर, दंड, वाहनतळ आणि सुरक्षाविषयक उपकरणांचा खर्च वाढल्याने वाहतूकदारांवरील आर्थिक भार वाढला आहे. ही दरवाढ नफा मिळविण्यासाठी नव्हे, तर वाढता तोटा भरून काढण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सचिव तुषार जगताप यांनी टायर, ऑइल, बॅटरी, सुटे भाग, चालकांचे वेतन आणि वाहनांच्या फिटनेस तपासणीचा खर्च वाढल्याचे नमूद केले. खासगी वाहनांसाठीही रिक्षांप्रमाणे शासनाने निश्चित दरपत्रक लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रस्तावित किलोमीटरनिहाय दर (जुना ते नवा) : १७ सीटर २३ ते २७ रुपये, २० सीटर २५ ते ३० रुपये, ३२ सीटर ३३ ते ३८ रुपये, ३५ सीटर ३६ ते ४२ रुपये, ४० सीटर ४१ ते ४५ रुपये, तर ४५ व ४९ सीटर बससाठी ४५ ते ५५ रुपये असे दर प्रस्तावित आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें