Pune News : पुणे पोस्टाच्या ‘दिवाळी फराळ’ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १४ दिवसांत १० हजार किलो फराळाची १,४७५ पार्सल परदेशात रवाना
Pune News :पुणे : भारतीय टपाल विभागाच्या पुणे प्रांतातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘दिवाळी फराळ कॅम्पेन २०२६’ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
1 मिनट पठन

Pune News :मोफत होम पिकअप आणि विशेष पॅकिंगची सुविधा; मोहीम २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार https://maharashtramirror.com/ Pune News
Pune News :पुणे : भारतीय टपाल विभागाच्या पुणे प्रांतातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘दिवाळी फराळ कॅम्पेन २०२६’ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १४ ते २७ ऑक्टोबर २०२६ या अवघ्या १४ दिवसांत सुमारे १० हजार किलो फराळाची १,४७५ पार्सल परदेशात यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहेत. परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा फराळ सुरक्षित आणि किफायतशीर दरात पोहोचविण्यासाठी नागरिक भारतीय टपाल सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
खासगी कुरिअर सेवांच्या तुलनेत परवडणारे दर हे या मोहिमेचे प्रमुख आकर्षण आहे. दहा किलोच्या पार्सलसाठी कॅनडाला ९,६७६ रुपये, जर्मनीला ५,८७६ रुपये, यूकेला ६,४६१ रुपये, अमेरिकेला ९,०५० रुपये, यूएईला ३,४९२ रुपये, ऑस्ट्रेलियाला ११,९१३ रुपये आणि रशियाला ६,७५० रुपये (जीएसटीसह) आकारले जात आहेत.
ग्राहकांच्या सोयीसाठी पुणे जीपीओ, पुणे सिटी हेड पोस्ट ऑफिस, मार्केट यार्ड, औंध डीएसओ, चिंचवड ईस्ट आणि पर्वतीसह प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये विशेष पॅकिंग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, पोस्टमनमार्फत मोफत घरपोच पार्सल पिकअपची सुविधाही उपलब्ध आहे. पार्सलच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी ऑनलाइन ट्रॅक अँड ट्रेस सुविधा दिली जाते. भारतीय टपाल विभागामार्फत २०० हून अधिक देशांमध्ये पार्सल पाठवता येते.
पुणे प्रांताचे संचालक डाक सेवा अभिजीत बनसोडे यांनी नागरिकांचे आभार मानत, परदेशातील आप्तेष्टांना फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी या विश्वासार्ह आणि किफायतशीर सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही विशेष मोहीम २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
मोफत पिकअपसाठी संपर्क :
ज्ञानेश्वर आंभुरे : ९८३४४८२१०५
निखील सपकाळ : ८५५२८२२२६७
संदीप बटवाल : ७०२८००७२३४
