Pune News : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune News पुणे: आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
2 मिनट पठन

परिमंडळ ४ मधील १३ सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार
Pune News पुणे: आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पोलीस परिमंडळ ४ च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १३ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये पुणे जिल्ह्यातून तडीपारीची धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त चिलुमुला रजनिकांत यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर, चतुःशृंगी, खडकी, विश्रांतवाडी, येरवडा आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जुगार चालवणे आणि बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे
१. शारदा राजू चव्हाण (वय ४४, रा. नाईक नगर, येरवडा) - गावठी दारू विक्री २. अल्ताफ मोहम्मद शेख (वय २३, रा. पाटील इस्टेट, खडकी) - गंभीर दुखापत व दहशत पसरवणे ३. आदिल जावेद शेख (वय १९, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) - दुखापत, चोरी व दहशत ४. विरेन लक्ष्मण वाघेला (वय २३, रा. येरवडा) - जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व जाळपोळ ५. सविता नंदु राठोड (वय ३५, रा. बालेवाडी) - गावठी दारू विक्री ६. जावेद जानशा शेख (वय ६०, रा. कर्वे हॉस्पिटल समोर) - अवैध जुगार धंदा ७. विकास दुर्गादास विटकर (वय ४२, रा. जनवाडी) - गावठी दारू विक्री ८. सौरभ संभाजी ढोलारे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) - जिवे ठार मारणे व दहशत पसरवणे ९. संगीता बबन साठे (वय ४४, रा. कल्याणीनगर, येरवडा) - गावठी दारू विक्री १०. शांताबाई नामदेव राठोड (वय ५७, रा. नाईक नगर, येरवडा) - गावठी दारू विक्री ११. शारदा सुरेश पवार (वय २९, रा. नाईक नगर, येरवडा) - गावठी दारू विक्री १२. अनु कुमार चव्हाण (वय ३५, रा. नाईक नगर, येरवडा) - गावठी दारू विक्री १३. नवीन उर्फ बच्चु मनोज वडावराव (वय २६, रा. शांतीनगर, येरवडा) - जिवे ठार मारणे व दहशत पसरवणे.
सन २०२६ मध्ये परिमंडळ ४ कार्यक्षेत्रात आतापर्यंत ५० हून अधिक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, १०० हून अधिक संशयित गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
वरील तडीपार केलेले गुन्हेगार त्यांच्या तडीपारीच्या कालावधीत पुणे शहर किंवा जिल्ह्यात कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष (संपर्क क्र. ११२) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) चिलुमुला रजनिकांत यांनी केले आहे.
