Pune police : पोलिसांकडे मांडता येणार थेट समस्या; शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’चे आयोजन
Pune police : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे तत्परतेने निरसन करण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 मिनट पठन

Pune police : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे तत्परतेने निरसन करण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘तक्रार निवारण दिन’ पाळला जाणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांना त्यांच्या तक्रारी, समस्या मांडता येणार आहेत.पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, येत्या शनिवारी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे गाऱ्हाणे व प्रलंबित अर्ज ऐकून घेतील.https://maharashtramirror.com/ Pune police
परिमंडळ १ ते ५ सह विशेष शाखा, मुख्यालय, गुन्हे शाखा तसेच आर्थिक व सायबर गुन्हे विभागाचे पोलीस उप-आयुक्त आणि विविध विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त आपापल्या नियुक्त पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित राहतील.समर्थ पोलीस ठाण्यात परिमंडळ-१ चे पोलीस उप-आयुक्त, भारती विद्यापीठ ठाण्यात परिमंडळ-२ चे पोलीस उप-आयुक्त आणि बाणेर ठाण्यात परिमंडळ-४ चे पोलीस उप-आयुक्त उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करतील. ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उप-आयुक्त किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त उपलब्ध नसतील, तेथे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक तक्रार निवारणाची प्रक्रिया पार पाडतील.https://maharashtramirror.com/ Pune police
अधिकारी व उपस्थितीची मुख्य ठिकाणे
समर्थ ठाणे: परिमंडळ १ पोलीस उप-आयुक्त भारती विद्यापीठ ठाणे: परिमंडळ २ पोलीस उप-आयुक्त वारजे माळवाडी ठाणे: परिमंडळ ३ पोलीस उप-आयुक्त बाणेर ठाणे: परिमंडळ ४ पोलीस उप-आयुक्त बंडगार्डन ठाणे: परिमंडळ ५ पोलीस उप-आयुक्त पुणे शहरातील ज्या नागरिकांचे तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात प्रलंबित आहेत अथवा ज्यांना आपल्या समस्या मांडायच्या आहेत, त्यांनी या संधीचा लाभ घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे शहर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
