मुख्य सामग्री पर जाएँ

Pune news : पुणे पोलिसांचा शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी दर शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुणे पोलिसांचा शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’
पुणे पोलिसांचा शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’

Pune News : सकाळी साडेदहा ते दुपारी दीडपर्यंत नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी; उपायुक्त, सहायक आयुक्त थेट पोलिस ठाण्यांत राहणार उपस्थित

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी दर शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शनिवारी (१२ सप्टेंबर) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. संबंधित तक्रारींचे शक्य त्या स्तरावर निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे.https://maharashtramirror.com/ pune News

पुणे शहर पोलिस आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील प्रादेशिक अपर पोलिस आयुक्त, परिमंडळीय पोलिस उपायुक्त, विभागीय सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना याबाबत आदेश दिले आहेत. प्रत्येक शनिवारी संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित तक्रारींची दखल घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ pune news

वरिष्ठ अधिकारी थेट पोलिस ठाण्यात

शनिवारी होणाऱ्या तक्रार निवारण दिनासाठी विविध परिमंडळांचे पोलिस उपायुक्त ठरावीक पोलिस ठाण्यांमध्ये उपस्थित राहतील. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त शिवाजीनगर, परिमंडळ दोनचे उपायुक्त मार्केटयार्ड, परिमंडळ तीनचे उपायुक्त नांदेड सिटी, परिमंडळ चारचे उपायुक्त विश्रांतवाडी, परिमंडळ पाचचे उपायुक्त येवलेवाडी, परिमंडळ सहाचे उपायुक्त काळेपडळ आणि परिमंडळ सातचे उपायुक्त लोणीकंद पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. https://maharashtramirror.com/ pune News

याशिवाय वाहतूक शाखेचे संबंधित उपायुक्त बिबवेवाडी येथे, मुख्यालयातील अधिकारी स्वारगेट येथे उपस्थित राहणार आहेत. गुन्हे शाखा तसेच आर्थिक व सायबर गुन्हे शाखेतील तक्रारींसाठी संबंधित शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ pune news

सहायक पोलिस आयुक्तही ऐकणार तक्रारी

विभागीय सहायक पोलिस आयुक्तांनाही विविध पोलिस ठाण्यांमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार फरासखाना, विश्रामबाग, पर्वती, आंबेगाव, कोथरूड, नऱ्हे, खडकी, विशेष शाखा, लक्ष्मीनगर, कोंढवा, लष्कर, हडपसर, मांजरी, लोहगाव, विमानतळ आणि बाणेर आदी ठिकाणी संबंधित अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत.https://maharashtramirror.com/ pune news

नागरिकांच्या तक्रारी अनेकदा पोलिस ठाण्याच्या स्तरावर प्रलंबित राहतात. काही प्रकरणांमध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर पुढील कार्यवाहीची माहिती मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार असते. अशा प्रकरणांमध्ये थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.

वरिष्ठ निरीक्षकांकडेही जबाबदारी

ज्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण दिनाच्या वेळी पोलिस उपायुक्त किंवा सहायक पोलिस आयुक्त उपस्थित नसतील, तेथे संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे या उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करतील.

तक्रार निवारण दिन केवळ एकदाच न घेता दर शनिवारी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांमधील थेट संवाद वाढण्याबरोबरच पोलिस ठाण्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठीही स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

प्रलंबित अर्जदारांनी उपस्थित राहावे

पुणे पोलिसांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या नागरिकांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे आणि तो अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहावे.

तक्रारींबाबत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या वेळी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि उपलब्ध संदर्भ घेऊन संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेयर करें