मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पीएमसीची १५ खाजगी रुग्णालयांना नोटीस; उपचारांचे दरपत्रक लपवणे पडले महागात

पुणे, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Pune News

Pune News : शहरातील खाजगी रुग्णालयांना उपचारांचे दरपत्रक लपवणे पडले महागात

पुणे, महाराष्ट्र मिरर


Pune News : खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांचे दर स्पष्टपणे कळावेत, यासाठी शासनाचे कडक नियम आहेत. मात्र, पुण्यात ( Pune News ) या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ खाजगी रुग्णालयांना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना दिली आहे.

रुग्णालयाच्या आवारात उपचारांचे शुल्क (टॅरिफ कार्ड) आणि रुग्णांचे अधिकार दर्शवणारे फलक न लावल्याचा ठपका या रुग्णालयांवर ठेवण्यात आला आहे. (pune pmc notice to 15 private hospitals) 'बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट, १९४९' (मुंबई शुश्रूषागृहे नोंदणी कायदा) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाने ही कडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे पुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ( Pune News )

नागरिकांच्या तक्रारींनंतर पालिकेची कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दर सहा महिन्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांची नियमित तपासणी केली जाते. यंदा जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत आरोग्य विभागाच्या पथकांनी शहरातील विविध भागांतील रुग्णालयांची कसून तपासणी केली. ( Pune News )

हेही वाचा: Eknath Shinde hospitalized : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

काही सजग नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचारांच्या अवाजवी शुल्काबाबत आणि पारदर्शकतेच्या अभावाविषयी पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पालिकेने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत १५ रुग्णालये दोषी आढळून आली. नोटीस देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये लहानांपासून ते मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांचा समावेश आहे.

Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

कायद्यातील तरतूद काय सांगते?

'बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट, १९४९' च्या कलम ७ नुसार, पालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक खाजगी रुग्णालय किंवा नर्सिंग होमला आपल्या आवारात दर्शनी भागामध्ये उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. ( Pune News )

रुग्णालयात प्रवेश केल्यावर रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सहज दिसेल अशा मुख्य ठिकाणी विविध उपचारांचे दर आणि 'रुग्णांचे अधिकार' प्रदर्शित करणे कायद्याने अनिवार्य आहे.

या फलकांवर प्रामुख्याने खाटांचे भाड, अतिदक्षता विभागाचे शुल्क, डॉक्टरांची फी आणि तपासण्यांचे दर असणे आवश्यक आहे. मात्र, दोषी रुग्णालयांनी हे दर लपवून ठेवल्याचे किंवा ते दर्शनी भागात न लावल्याचे तपासणीत उघड झाले.

RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती

परवाना रद्द होण्याची शक्यता

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या सर्व रुग्णालयांना त्रुटी सुधारण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नियमांचे पालन करण्याची समज दिली जाते. परंतु, दिलेल्या मुदतीत जर रुग्णालयांनी शुल्काचे फलक लावले नाहीत, तर त्यांच्यावर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमांचे उल्लंघन ( Pune News )करणाऱ्या किंवा प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना तात्पुरता निलंबित किंवा थेट रद्द केला जाऊ शकतो, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

https://www.instagram.com/p/DaVDoX3MqIA

शेयर करें