मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : पुणे महापालिका विविध विभागांमार्फत १ लाख ७० हजार वृक्षलागवड करणार

मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना किमान एक रोप लावणे बंधनकारक

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PUNE NEWS : पुणे महापालिका विविध विभागांमार्फत १ लाख ७० हजार वृक्षलागवड करणार

मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना किमान एक रोप लावणे बंधनकारक

निलेश राऊत
पुणे: शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी महापालिकेने 'हरित पुणे, समृद्ध पुणे' ही वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत २०२६-२०२७ या कालावधीत मनपाच्या विविध विभागांमार्फत १ लाख ७० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) रोजी किमान एक रोप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.PUNE NEWS

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर २०२६ अखेर या सर्व विभागांनी मिळून १ लाख ७० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यात क्षेत्रीय कार्यालये-वृक्ष प्राधिकरण विभागाला ७५ हजार, पथ विभाग १५ हजार, भवन विभाग १५ हजार, प्रकल्प विभाग १५ हजार, मलनिस्सारण विभाग १५ हजार, पाणीपुरवठा विभागाला १० हजार, शालेय शिक्षण विभाग ५ हजार, घनकचरा व्यवस्थापन ५ हजार, उद्यान विभागाला ५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे.PUNE NEWS

पुढील २ वर्षे त्याचे संगोपन देखील करावे लागणार
मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ५ जूनला किमान १ रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. पुढील २ वर्षे त्याचे संगोपन करून झाड कसे वाढेल, याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक विभागाने केलेल्या वृक्षलागवडीची साप्ताहिक माहिती 'परिशिष्ट-अ' प्रपत्रात भरून दर सोमवारी महापालिका आयुक्त व सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण यांच्याकडे सादर करावी, असे आदेशात नमूद आहे. परिशिष्ट-अ मध्ये वृक्षलागवड करणाऱ्याचे नाव, दिनांक, ठिकाण, प्रजातीचे नाव, रोपांचे नाव व संख्या, जीपीएस फोटो व गुगल लिंकसह माहिती द्यावी लागणार आहे.

PUNE NEWS

शेयर करें