PUNE NEWS : पुण्यात मान्सूनला ब्रेक
उकाड्यामुळे नागरिक हैराण
1 मिनट पठन

उकाड्यामुळे नागरिक हैराण
पुणे, महाराष्ट्र मिरर : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात पुन्हा उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. नैऋत्य मान्सूनचा जोर तात्पुरता कमी झाल्यामुळे दिवसभर कडक ऊन पडत असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.PUNE NEWS

आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले कमाल तापमान शुक्रवारी ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवला. शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, दापोडी आणि चिंचवड येथील हवामान केंद्रांवर ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमानाची नोंद झाली.
सकाळपासून निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील आर्द्रतेसह उकाडा वाढला.PUNE NEWS
पावसाळ्याच्या हंगामातही अशी उष्ण व दमट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात बहुतांश भाग कोरडे राहिल्याने नागरिकांसह शेतकरीही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.PUNE NEWS
दरम्यान, पुणे शहरात पाऊस थांबला असला तरी ग्रामीण भागातील काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. इंदापूर, राजगुरूनगर, शिरूर तसेच शहरालगतच्या काही भागांत शुक्रवारी तुरळक पाऊस झाला. घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कमी राहिला असून केवळ हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्याची नोंद झाली आहे.
हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस उष्णता आणि दमटपणा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
PUNE NEWS
