मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल

११ ते १८ जुलै दरम्यान जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PUNE NEWS : ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल

११ ते १८ जुलै दरम्यान जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन

पुणे PUNE NEWS: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त ८ जुलै रोजी आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होणार असून, जिल्ह्यातील पालखी मार्गावर ११ ते १५ जुलैदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.PUNE NEWS

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे: ११ जुलै (पहाटे २) ते १३ जुलै (रात्री १२): पुणे–सासवड टप्प्यात दिवे घाट आणि बोपदेव घाट मार्गे सासवडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहने खडी मशीन चौक–कात्रज–कापूरहोळ मार्गे वळविण्यात येतील. सासवडहून पुण्याकडे येणारी वाहने गराडे–खेडशिवापूर मार्गे जातील.PUNE NEWS

१३ जुलै (पहाटे २) ते १४ जुलै (रात्री १२) : सासवड–जेजुरी–वाल्हे–नीरा मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, पुणे व नीराकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–नीरा हा पर्यायी मार्ग वापरावा.PUNE NEWS

१५ जुलै (पहाटे २ ते सायंकाळी ५) : वाल्हे–लोणंद टप्प्यात पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–नीरा तसेच नीरेहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सासवड–जेजुरी–मोरगाव हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.PUNE NEWS

१५ ते १८ जुलै : लोणंद–फलटण मार्गावरील वाहतुकीसाठी फलटण–लोणंदहून पुण्याकडे येणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी सर्व वाहने शिरवळ मार्गे वळविण्यात येतील.PUNE NEWS

पालखी सोहळ्यादरम्यान नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

PUNE NEWS

शेयर करें