मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुण्यात ज्युनिअर डेव्हलपरची नोकरी, 3000 इंजिनीअर मुलाखतीसाठी हजर, रस्त्यापर्यंत रांगा, आयटी क्षेत्रात नोकरीचे संकट!

Pune Walk in interview Job Line Job : वॉक-इन मुलाखतीसाठी पुण्यातील एका आयटी कंपनीबाहेर 3000 हून अधिक इंजिनीयरच्या लांबलचक रांगा दिसल्या.

व
विवेक

1 मिनट पठन

Pune News : पुण्यात ज्युनिअर डेव्हलपरची नोकरी, 3000 इंजिनीअर मुलाखतीसाठी हजर, रस्त्यापर्यंत रांगा, आयटी क्षेत्रात नोकरीचे संकट!

Pune Walk in interview Job Line Job : वॉक-इन मुलाखतीसाठी पुण्यातील एका आयटी कंपनीबाहेर 3000 हून अधिक इंजिनीयरच्या लांबलचक रांगा दिसल्या. हे स्पर्धात्मक जॉब मार्केटची कठोरता दर्शवते. 100 ज्युनियर डेव्हलपर पदांसाठीच्या गर्दीने नोकरीच्या क्षेत्रातील बदल आणि ऑटोमेशन वाढण्याशी संबंधित चिंता देखील अधोरेखित केल्या.

पुणे :- सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून भारतात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा व्हिडिओ आयटी क्षेत्रातील स्पर्धात्मक जॉब मार्केटवर प्रकाश टाकतो. या फुटेजमध्ये 3000 हून अधिक अभियंते रांगेत उभे आहेत.पुण्यातील एका कंपनीबाहेर नोकरीच्या मुलाखतीसाठी लांबलचक रांगेत उभे असलेले हे अभियंते होते.

मगरपट्टा येथे डेव्हलपर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची गर्दी होती. प्रत्येक तरुणाच्या हातात बायोडेटा आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या फाईल्स होत्या.या कंपनीने 100 जूनियर डेव्हलपर साठी नोकऱ्या निर्माण केल्याचं सांगण्यात येत आहे. नोकरीसाठी भरती वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाणार होती. भरतीसाठी दिलेली तारीख. त्या दिवशी गर्दी जमली. लांबलचक रांग पाहून लोकांनी थांबून विचारले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

शेयर करें