PUNE NEWS : पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्राला मिळणार आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नकाशावर नवे स्थान
2 मिनट पठन

महाराष्ट्राला मिळणार आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नकाशावर नवे स्थान
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: महारात मुंडवा येथील द फर्न हॅबिटेट येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडत असून, देश-विदेशातील अव्वल बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. बुद्धिबळ कीडा ट्रस्टतर्फे आयोजित आणि द हॅबिटेट यांच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा फिडे (FIDE), अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (MCA) आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ (PDCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाची आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धा होत असल्याने उदयोन्मुख भारतीय खेळाडूंना अनुभवी ग्रँडमास्टर्सविरुद्ध खेळून ग्रँडमास्टर नॉर्म्स मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.PUNE NEWS

भारत, बेलारूस, श्रीलंका आणि अमेरिका या चार देशांतील दहा मानांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यात तीन ग्रँडमास्टर, सहा इंटरनॅशनल मास्टर आणि एक फिडे मास्टर यांचा समावेश आहे. भारताचे ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता, बेलारूसचे अलेक्सेई अलेक्झांड्रोव्ह आणि अलेक्सी फेडोरोव्ह हे या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.PUNE NEWS
या स्पर्धेच्या सर्व नऊ फेऱ्या दररोज सकाळी १० वाजता खेळवल्या जात आहेत. प्रत्येक खेळाडूला ९० मिनिटांचा वेळ आणि पहिल्या चालीपासून प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांचा वाढीव वेळ दिला गेला आहे.PUNE NEWS
स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम १२.५० लाख रुपये असून विजेत्याला १.९० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळणार आहे. समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होईल. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच आर. श्रीवत्सन काम पाहणार असून, चेसबेस इंडिया, कुंटे'ज चेस अकॅडमी आणि किंडर स्पोर्ट्स यांचे सहकार्य लाभले आहे.PUNE NEWS
स्पर्धेतील प्रमुख खेळाडू
जीएम अभिजीत गुप्ता (भारत) – २५४०
जीएम अलेक्सेई अलेक्झांड्रोव्ह (बेलारूस) – २४३३
जीएम अलेक्सी फेडोरोव्ह (बेलारूस) – २३८८
आयएम कुशाग्र मोहन (भारत) – २४५६
आयएम नितीश बेलूरकर (भारत) – २४०९
आयएम एल.एम.एस.टी. डी सिल्वा (श्रीलंका) – २३८२
आयएम एस. अक्षय बोरगावकर (भारत) – २३८०
एफएम वैद्यनाथन कन्नन (अमेरिका) – २३४७
आदित्य अग्रवाल (भारत) – २३८२
या स्पर्धेमुळे पुणे शहरालाच नव्हे तर महाराष्ट्रालाही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नकाशावर नवे स्थान मिळणार असून, बुद्धिबळप्रेमींना जागतिक दर्जाच्या सामन्यांचा आनंद घेण्याची आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्पर्धेचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.
PUNE NEWS
