मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : हर्षद चेमटे ठरला एशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचा सुवर्णविजेता…

थायलंडमध्ये भारताचा तिरंगा दिमाखात फडकावला…..!

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PUNE NEWS : हर्षद चेमटे ठरला एशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचा सुवर्णविजेता…

थायलंडमध्ये भारताचा तिरंगा दिमाखात फडकावला…..!

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं पुणे विमानतळावर त्याचा स्वागत

पुणे महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: थायलंडमध्ये सुरू असलेल्या १५ वर्षांखालील एशियाई चॅम्पियनशिप कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत हर्षदने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावला.PUNE NEWS

अंतिम फेरीत हर्षदने कजाकिस्तानच्या येरसुल्तान सुलेमान याच्यावर ११-१० अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात त्याने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आक्रमक खेळी आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर विजय संपादन केला.PUNE NEWS

शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावचा रहिवासी असलेल्या हर्षदने अल्पवयातच कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत. सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्णयश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.PUNE NEWS

पुणे विमानतळावर जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याचं स्वागत केलं.

शेयर करें