PUNE NEWS : नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धरले धारेवर
पाणी पुरवठा व टँकर माफियांकडून होणाऱ्या होते आहे सर्वसामान्यांची लूट
2 मिनट पठन

पाणी पुरवठा व टँकर माफियांकडून होणाऱ्या होते आहे सर्वसामान्यांची लूट
निलेश राऊत
पुणे, PUNE NEWS: शहरात महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा होणारा अपुरा पुरवठा, महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकर कडून होणारा विस्कळीत पुरवठा, खाजगी टँकर माफियांकडून होणाऱ्या लुटीवरून मंगळवारी नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले.PUNE NEWS

टँकर पॉईंट वरून खाजगी टँकर पाणी भरतात व पुढे हेच पाणी सोसायट्यांना अधिक दराने विकतात, असा आरोप नगरसेवक पुनीत जोशी यांनी करून, हा प्रकार बंद करण्याची मागणी केली. तसेच टँकर पॉईंटवरील सीसीटीव्ही सरू नाहीत, टँकर मधून पाण्याची मोठी गळती होते, असा आरोप केला.PUNE NEWS
टँकरचे दर कमी करण्यात यावे
प्रशांत जगताप यांनी एका टँकरला १,५०० रुपये द्यायला लागतात त्यामुळे टँकरचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी केली. दत्ता बहिरट यांनी पाणी कपात सुरू झाल्यापासून शहरात टँकर चालकांच्या धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे पण महापालिकेचे त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला.PUNE NEWS
सचिन पोटे यांनी ८० टक्के टँकर हॉटेल व्यावसायिक यांना तर २० टक्के रहिवाशी भागात नागरिकांना देतात असा आरोप केला. काका चव्हाण रुपाली धावडे यांनी बांधकाम व्यावसायिक खाजगी बोअरवेल मधून पाणी घेऊन दोन ते तीन हजार रुपयांना विकतात पण महापालिकेचे त्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप केला.
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी २४/७ पाणी पुरवठा व्यतिरिक्तच्या कामाव्यतिरिक्त किती कामाच्या निविदा मागविण्यात आल्याचे विचारले. यावेळी ८ गावांसाठी ५०० कोटींच्या निविदांची कामे करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.PUNE NEWS
पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे उत्तर
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी टँकर पॉइंटवर वार्डन नेमण्याबरोबरच, सीसीटीव्ही बसविणे, टँकरची मागणी नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केल्यावर तातडीने पुरवठा करणे यावर भर दिला जाईल असे सांगितले.
पाणी कपात सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात टँकर मागणी व पुरवठा यामध्ये अडचणी आल्या होत्या पण आता सर्वत्र पाणी पुरवठा दिवसा आड होत आहे, ठेकेदारांच्या टँकर कडून सुरळीत पाणी पुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. तसेच शहरात नवीन टँकर पॉईंट लवकरच सुरू होत असल्याचे सांगितले.PUNE NEWS
कमी दराच्या निविदांबाबत एसओपी तयार करणार: अनिरुद्ध पावसकर
पाणी पुरवठ्याच्या कामात निविदा कमी दराने म्हणजेच ३० ते ४० टक्के कमी दराने येतात, याबाबत सभागृहात बिडकर यांनी प्रश्न विचारला असता, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कमी दराने येणाऱ्या कामाच्या निविदांची दखल प्रशासनाने घेतली असून, त्याबाबत एक एसओपी तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
पाणी जपून वापरा: पवनीत कौर
आजमितीला ३.६० टीएमसी पाणीसाठा आहे. महिन्याला १.६० टीएमसी पाणी लागत आहे. दिड महिन्यांपुरते आपल्याकडे पाणी आहे. भामा-आसखेड येथे ही पाणी कपात केली आहे. शहरात पाहिले ८ टँकर पॉईंट होते त्यात तीन नवे टँकर पॉईंट वाढविण्यात येत आहेत. ठेकेदारांच्या टॅंकर वरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे. खाजगी टँकर च्या दरात २५ टक्के दर कमी करणे बाबत किंवा ते बंद करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. खाजगी बोअर वेल वर मात्र मनपाचे नियंत्रण नसल्याचे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले.PUNE NEWS
पाणी पुरवठा कामांमध्ये पुर्वी १० टक्के पेक्षा कमी दराने निविदा भरण्यात येत होत्या. पण आता २० टक्के पेक्षा जास्त कमी दराने निविदा भरल्यास चांगले काम होणार नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.
PUNE NEWS
