मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : एक दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर

पुणे मनपाकडून १५ जूनपासून सम-विषम तारखेनुसार विभागनिहाय नियोजन

पघ
प्रशिक घस्ते

7 मिनट पठन

PUNE NEWS : एक दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर

पुणे मनपाकडून १५ जूनपासून सम-विषम तारखेनुसार विभागनिहाय नियोजन

पुणे PUNE NEWS: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या अत्यंत कमी म्हणजेच केवळ ५.०३ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी पुणे महानगरपालिकेच्या वाट्याला केवळ ३ टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा प्रत्यक्ष पाणी वाटपाच्या तुलनेत खूपच कमी असून यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.PUNE NEWS

या कठीण पार्श्वभूमीवर पुणे शहरात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सोमवार, 15 जून 2026 पासून संपूर्ण पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी नागरिकांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून शहरात बांधकाम, खाजगी व सार्वजनिक स्विमिंग पूल, वाहने धुणे आणि इतर अनावश्यक कामांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास तातडीने सक्त बंदी घातली आहे.PUNE NEWS

एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
सम तारखेला पाणीपुरवठा

  • १. चतु:श्रृंगी विभाग : या विभागांतर्गत सम तारखेला आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचनगल्ली, भंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, राजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण, मॉडेल कॉलनी, हनुमान नगर, वडारवाडी, शिवाजीनगर, रेव्हेन्यू कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर, आशानगर, बोपोडी, चिखलवाडी, संपूर्ण बालेवाडी, बालेवाडी गावठाण, मोहन नगर, धनकुडे वस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण, वीरभद्र नगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा, सुतारवाडी गावठाण, पाषाण पाट, सुस रोड, पंचवटी, म्हाळुंगे गाव, सुस गाव आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या भागात सम तारखेला पाणीपुरवठा केला जाईल.
  • २. एसएनडीटी विभाग : या विभागामध्ये सम तारखेला वारजे माळवाडी, कर्वेनगरचा ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवे पर्यंतचा संपूर्ण भाग, रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे धावडे आणि कोथरुडमधील केवळ लक्ष्मीनगर या भागात एक दिवसाआड पाणी दिले जाईल.
  • ३. स्वारगेट विभाग (भाग १) : या भागात सम तारखेला बालाजीनगर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा पॅलेस परिसर, पवार हॉस्पिटल परिसर, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, किर्लोस्कर सोसायटी, विवेका नगर, श्रीहरी सोसायटी, हिलपॉईंट सोसायटी, कोंढवा बुद्रुकमधील साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर, गोकुळ हॉटेल परिसर, साळवे गार्डन, श्रीकृष्ण कॉलनी, काकडेवस्ती, अशर्फनगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, अलिफ टॉवर, सावकाशनगर, राजीवगांधीनगर, अप्पर इंदिरानगरचा काही भाग, कोंढवा बुद्रुक गावठाण, लक्ष्मीनगर, वटोबा मंदिर, हागवणे वस्ती, टिळेकरनगर, मेहतानगर, खडी मशीन चौक, पारगेनगर, कपीलनगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, पिसोळी रोड, येवलेवाडी, कामठेपाटीलनगर, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, कात्रज चौक ते कात्रज दूध डेअरी पर्यंतचा परिसर, भारती विद्यापीठ मागील परिसर, त्रिमूर्ती चौक ते अशोका आगम पर्यंतचा भाग, भारती विहार, श्रीराम निवास, शामाप्रसाद, सावंत विहार, सावंत गार्डन, सिक्ससेन्स, कांचननगरी, वंडरसिटी, धनकवडी गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई सोसायटी, शंकरदर्शन सोसायटी, आदर्शनगर, सह्याद्रीनगर, रामचंद्रनगर, तळजाई ग्रीन सोसायटी, केशव कॉम्प्लेक्स सोसायटी, फाईव्ह स्टार सोसायटी आणि तळजाई पठार या भागात सम तारखेला पाणीपुरवठा केला जाईल.
  • ४. स्वारगेट विभाग (भाग २) : या अंतर्गत सम तारखेला काशेवाडी, लोहियानगर, सहकारनगर, चुडामन तालीम, गुरुनानक नगर, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, शुक्रवार पेठ, जुना बाजार, सोमवार पेठ, कसबापेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ, मोमिनपुरा, स्वारगेट पोलीस लाईन, नवीपेठ, पर्वती गाव, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ, नानापेठ, भवानीपेठ, पुणे स्टेशन आणि सोमवारपेठ पोलीस लाईन या भागात सम तारखेला पाणी मिळेल.
  • ५. बंडगार्डन विभाग : या विस्तृत भागात सम तारखेला शंकर नगर, चौधरी वस्ती, सताव वस्ती, पंढरी नगर, बोराटे वस्ती, पाटील बुवा नगर, थिटे नगर, काळूबाई नगर, खराडकर पार्क, राघोबा पाटील नगर, साईनाथ नगर, समर्थनगर, श्रीराम सोसायटी लेन १ ते ११, खुळेवाडी, खांदवेनगर, चंदननगर भाजी मंडई, दिनकर पठारे वस्ती, ठुबेपठारे नगर, एकनाथ पठारे वस्ती, अशोक नगर, चंदननगर, शिवाजी पुतळा, संघर्ष चौक, चव्हाणनगर, प्रीतनगर, राघवेंद्र नगर, करनगर, म्हाडा, यशवंतनगर, तुकाराम नगर, अनुसया पार्क, वृंदावन नगर, येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता, मदर तेरेसा, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नुरानी मस्जिद, नेताजी नगर, गांधीनगर, काश्मीर कॉलनी, भीमा शंकर वसाहत, यशवंत नगर, खड्डा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, डॉ. आंबेडकर वसतिगृह, सुभाष नगर, नवी खडकी तालीम, बाराते वस्ती, भोसले वस्ती, कुमार आंगण, प्रतिक नगर सेक्टर १ ते ६, जेसीडी पार्क, पंचशील नगर, मित्तल सोसायटी, सैनिक नगर, कामगार नगर, चंद्रमा नगर, प्रेस कॉलनी, ड्रीम सोसायटी, शिवाई कॉलनी, श्रमिक नगर, महिला जेल, गणेश नगर, म्हस्के वस्ती, कळस गावठाण, माळवाडी जाधव वस्ती, मिलिट्री ग्रेप सेंटर आणि विश्रांतवाडी येथील वडार वस्ती या भागात सम तारखेला पाणीपुरवठा केला जाईल.
  • ६. लष्कर पाणीपुरवठा : या अंतर्गत सम तारखेला काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, हेवन पार्क, टँकर पॉईंट, रामनगर झोपडपट्टी, कोरेगाव पार्क, बंडगार्डन रोड, ताडीवाला रोड झोपडपट्टी, ससून हॉस्पिटल, बी.टी. कवडे रोड दोन्ही बाजू, भीमनगर, घोरपडी अंशतः, भारत फोर्ज कंपनी लगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग, तारादत्त कॉलनी, डोबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल, केशवनगर, साडेसतरानळी आणि मांजरी या भागात सम तारखेला पाणीपुरवठा केला जाईल.PUNE NEWS
  • विषम तारखेला पाणीपुरवठा

    • १. चतु:श्रृंगी विभाग : या विभागांतर्गत विषम तारखेला सुस गाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. उर्वरित चतुशृंगी विभागातील सर्व नियमित भागात विषम तारखेला पाणी बंद राहील.
    • २. एसएनडीटी विभाग : या विभागात विषम तारखेला संपूर्ण कोथरुड (लक्ष्मीनगर वगळून), कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट ते विठ्ठल मंदिर रस्त्याची डावी बाजू), एरंडवणा भाग, बावधन खुर्द आणि बावधन बुद्रुक या भागात पाणीपुरवठा केला जाईल.
    • ३. स्वारगेट विभाग (भाग १) : या अंतर्गत विषम तारखेला संतोषनगर संपूर्ण परिसर, दत्तनगर संपूर्ण परिसर, आंबेगाव खुर्द, वाघजाई नगर परिसर, अटल अकरा, आंबेगाव खुर्द गावठाण परिसर, हनुमाननगर, जांभूळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, टेलको कॉलनी गल्ली क्रमांक १ ते १०, टेलको कॉलनी ४ था व ५ वा टप्पा, गणेश गॅलेक्सी सोसायटी, लेक व्हिस्टा सोसायटी, व्यंकटेश क्षितिज सोसायटी व ३ रा टप्पा, आंबेगाव खुर्द व शेजारील मेघस्पर्श सोसायटी, स्वामी नारायण मंदिर, सनसिटी सोसायटी, तुकारामनगर, निविता सोसायटी, सन ब्राईट शाळा, कात्रज गावठाण, गुजरवाडी फाटा, राजस सोसायटी, विद्यानगर, आनंदनगर, उत्कर्ष सोसायटी, महादेवनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुंदरबन, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज-कोंढवा रोड परिसर, पॅरामाउंट गार्डन, यशस्वी सोसायटी, आयडीयल पार्क, खेतेश्वर आश्रम, शिक्षक सोसायटी, स्वामी समर्थनगर, राजमाता कॉलनी, समीर, बाळकृष्ण, आदिशक्ती, सौदागर, राजमुद्रा, रिक्षा, विद्यादिप सोसायट्या, गुलाबनगर व चैतन्यनगर परिसर, स्वाती सोसायटी, राघवनगर, गिरी नगर, अक्षयनगर, आंबेगाव पठार संपूर्ण परिसर, सहकारनगर, क्षितिज व आविष्कार सोसायटी, दाते बसस्टॉप, आंबेगाव बुद्रुक गावठाण, वेताळनगर, फिरंगाई माता मंदिर परिसर, पोतदार स्कूल, अमित ब्लुमफिल्ड आणि वाघजाई परिसर या भागात विषम तारखेला पाणी दिले जाईल.
    • ४. स्वारगेट विभाग (भाग २) : या विभागातील सर्व भागांमध्ये विषम तारखेला अधिकृतपणे पाणी बंद राहील, कारण या संपूर्ण भागात सम तारखेनुसार पाणी कपातीचे नियोजन करण्यात आले आहे.
    • ५. बंडगार्डन विभाग : या भागात विषम तारखेला चंदननगर, वडगाव शेरी झोन १ ते ३, आपले घर, तुळजाभानी नगर, समर्थनगर राजाराम पाटील नगर, ईओन आयटी पार्क, खराडी, पाटील बुवा नगर, भनगाई वस्ती, गेरा बंगलो, शेतकरी नगर, गेरा पार्क साऊथ आणि नॉर्थ, धनलक्ष्मी पार्क, मित्रमंडळ, दत्त प्रसाद सोसायटी, सुनिता नगर, गणेशनगर, स्वामी समर्थ मंदिर, समता सोसायटी, आनंद पार्क, आनंद मंगल सोसायटी, राजश्री कॉलनी, इंदिरा नगर, मतेनगर, पुण्य नगरी, महावीरनगर, सोमनाथ नगर, सोपाननगर, संगमवाडी, जयजवाननगर, रामनगर, यूपी हॉटेल परिसर, अशोक नगर, गांधी नगर, शास्त्री नगर, नगर रोड, डंकर लाईन, कल्याणी नगर, अधीक्षक बंगला परिसर, आंबेडकर सोसायटी, राम सोसायटी, हरीगंगा सोसायटी, समाजकल्याण वस्ती गृह, फुलेनगर, इंदिरा नगर, भारत नगर, शांतीनगर, अहिल्यानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, कतारवाडी, साप्रस, आरोग्यभवन, विश्रांतवाडी पोलीस लाईन, बर्माशेल, संजय पार्क, विमाननगर, एअरपोर्ट, एअरफोर्स, पराशर व श्रीपार्क सोसायटी आणि दिनकर पठारे वस्ती या भागात विषम तारखेला पाणी दिले जाईल.
    • ६. लष्कर पाणीपुरवठा : या अंतर्गत विषम तारखेला वानवडी गावठाण, चौगुले मळा, शितळादेवी मंदिर व परिसर, जगताप चौक व इतर परिसर, आझादनगर, मानेवस्ती, राजीवगांधी नगर, शांतीनगर, रिव्हेरा सोसायटी, शिवानंद गार्डन, गंगा सॅटेलाईट, सनग्रेस स्कूल, केदारी नगर, विकास नगर, उदयबाग, सोपानबाग, शिवकर वस्ती, लक्ष्मीनगर, जांभूळकर मळा, होलेवस्ती, प्रेझेंट पार्क, सेंट पेट्रिक टाउन, क्लासिक अपार्टमेंट, विवेक अपार्टमेंट, मधुबन सोसायटी, कवडे मळा, ब्रम्हाबाग, प्रीतीप्रकाश, कंदर, अमेय, ९३ मॉलपासून रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, एस.व्ही.नगर, हडपसर कचरा डेपो, शांतीनगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, भीमपुरा गल्ली क्रमांक १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, एम.जी.रोड, ईस्ट स्ट्रीट, जी.ई. परिसर, घोरपडी, श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, कोरेगाव पार्क, सर्वोदय कॉलनी, धायरकर वस्ती, पासपोर्ट ऑफिस, नॉर्थ मेन रोड, भाग्योदयनगर, शिवनेरी नगर, साईबाबा नगर, केशवनगर, साडेसतरानळी आणि मांजरी या भागात विषम तारखेला पाणीपुरवठा केला जाईल.PUNE NEWS
    • तांत्रिक अपवाद आणि पाणी बचतीचे नियम
      या नियोजनामध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक अपवाद आणि विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यानुसार सुसगाव, केशवनगर, साडेसतरानळी आणि मांजरी या भागात सम व विषम दोन्ही तारखेला एक दिवसाआड टँकरद्वारे किंवा नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. तसेच फुरसुंगी आणि देवाची उरुळी या भागात 2 दिवसांनी तर वाघोली जलकेंद्र परिसरामध्ये दर 3 दिवसांनी पाणीपुरवठा केला जाईल. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, तांत्रिक अडचणींमुळे भामा आसखेड प्रकल्पातून सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत या प्रकल्पातून ज्या भागास पाणीपुरवठा होत आहे तो उत्तर पूर्व भाग तूर्तास या एक दिवसाआड पाणीकपातीच्या नियोजनातून पूर्णपणे वगळण्यात आला असून तेथील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर त्याचे नियोजन स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.PUNE NEWS

      यासोबतच, आषाढी एकादशी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 8, 9, 10 व 11 जुलै 2026 या कालावधीत संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ आणि सुरळीत ठेवला जाईल, जेणेकरून वारकरी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही. पाणी कपातीच्या काळात नागरिकांना पाणीपुरवठा विषयक तक्रारी नोंदवण्यासाठी मनपाने 18001030222 हा टोल फ्री क्रमांक आणि 9689900002 हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

      PUNE NEWS

      शेयर करें