मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : ‘अद्वितीय पुणे’ आता ‘पुणे प्रथम’

महापालिका सर्व साधारण सभेचा निर्णय

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

PUNE NEWS : ‘अद्वितीय पुणे’ आता ‘पुणे प्रथम’

महापालिका सर्व साधारण सभेचा निर्णय

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाठी आणि जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी ‘पुणे प्रथम’ ही संकल्पना आणि बोधचिन्ह अधिकृतपणे स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्व साधारण सभेत एकमताने घेण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही संकल्पना मांडली होती. आता या पुढे महापालिकेच्या सर्व विभाग, वाहने, फाईल, प्रकल्प आदी सर्वच ठिकाणी ‘अद्वितीय पुणे’ ऐवजी ‘पुणे प्रथम’ असा उल्लेख राहणार आहे.PUNE NEWS

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६३ (२९) मधील तरतुदींनुसार, प्रशासकीय कार्यक्षमता व शहराच्या सुशासनामध्ये एकरूपता आणण्यासाठी, अस्तित्वात असलेल्या सर्व चिन्हांकनांचे अद्ययावतीकरण करून ‘पुणे प्रथम’ ही नवीन नाममुद्रा सर्व स्तरांवर लागू करण्यात यायेणार आहे. शहराचे सुशोभिकरण आणि सुशासनासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे महापालिकेचे स्वेच्छाधीन कर्तव्य आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात पुणेकरांचा सक्रिय सहभाग आणि जन-संवादाची भावना म्हणजेच ‘पुणे प्रथम’ असून, या माध्यमातून व लोकसहभागातून शहराचे ब्रेडिंग अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.PUNE NEWS

या संपूर्ण ब्रँडिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हेरिटेज विभाग यांची नोडल विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाने ब्रँडिंग धोरणाचा सविस्तर मसुदा तयार करून त्यावर महापालिका आयुक्तांची मान्यता घ्यावयाची आहे. याचबरोबर भारतीय बोधचिन्ह आणि नाव अधिनियम १९५० व ट्रेडमार्क कायद्यानुसार लोगो व टॅगलाईनची बौध्दिक मालमत्ता म्हणून नोंदणी करावयाची आहे.

वारसा स्थळांच्या ठिकाणी अंमलबजावणी करताना हेरिटेज विभागाची तांत्रिक मान्यता व देखरेख याकरिता अनिवार्य राहणार आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या मूळ सौंदर्याला बाधा न आणता ‘पुणे प्रथम’ ब्रेडिंगचा दर्जा राखण्याची जबाबदारी हेरिटेज विभागाचीच राहणार आहे. याचबरोबर महापालिकेच्या इतर सर्व विभागांकडून या ब्रेडिंगची अंमलबजावणी करून घेण्याच्या सूचना हेरिटेज विभागाला देण्यात आल्या आहेत.PUNE NEWS

महापालिकेची अधिकृत थीम म्हणून मान्यता

‘पुणे प्रथम’ च्या ठरावानुसार पुणे प्रथम ही संकल्पना पुणे महापालिकेची अधिकृत थीम म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक प्रगती यांचा संगम दर्शविणाऱ्या विशेष बोधचिन्हास आजच्या सभेत अंतिम मान्यता देण्यात आली.

… अन्यथा मान्यता मिळणार नाही

महापालिकेत यापुढे कोणत्याही नवीन प्रकल्पाचे नियोजन किंवा अंदाजपत्रक मंजूर करताना, त्यामध्ये ‘पुणे प्रथम’ ब्रँडिंगचा अंतर्भाव असणे बंधनकारक राहणार आहे. तर ज्या प्रकल्पांच्या आराखड्यात या सुधारित निकषांचा समावेश नसेल त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली जाणार नाही.PUNE NEWS

‘पुणे प्रथम’ राहणार सर्वत्र

महापालिकेच्या स्थापत्य व विकास कामांमध्ये म्हणजेच इमारती, उद्याने, उड्डाणपूल आणि प्रकल्प माहिती फलक याठिकाणी तसेच प्रशासकीय कामकाजात म्हणजेच अधिकृत पत्रके, निविदा सूचना, जाहिराती, सर्व सोशल मिडीया, वेबसाईटवर, पीएमपीएमएल बस सेवा, कचरा संकलन वाहनांसह महापालिकेची सर्व वाहने यावर ‘पुणे प्रथम’ वापर अनिवार्य राहणार आहे.

PUNE NEWS

शेयर करें