PUNE NEWS : महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतीला करात ५०% सवलतीवर शिक्कामोर्तब
५०० स्क्वे.
1 मिनट पठन

५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या एका मिळकतीला मिळणार सवलत
निलेश राऊत
पुणे, PUNE NEWS: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावे असलेल्या ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या एका निवासी मिळकतीला मिळकतकरात ५०% सवलत देण्याच्या भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणेवर स्थायी समितीच्या निर्णयानंतर मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देऊन शिक्कामोर्तब करण्यात आले.PUNE NEWS

महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यतेनंतर हा विषय अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळेल या भरवश्यावर महापालिका प्रशासनाने या सवलतीच्या बाबतीत नियमावली तयार करावी, असे यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.PUNE NEWS
योजना केवळ आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मर्यादित
महिलांच्या नावे असलेल्या ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या एका निवासी मिळकतींला मिळकतकरात ५०% सवलत ही दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ज्या मिळकती महिलांच्या नावावर नोंद असतील, त्यांनाच मिळणार आहे. सदर योजना केवळ आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील चालू मागणीपुरती मर्यादित राहणार आहे.
दिनांक १ एप्रिल २०२६ पूर्वीच्या थकबाकीवर सदर योजना लागू राहणार नाही. सदर योजनेअंतर्गत व्याज, दंड व शास्ती यावर कोणतीही सवलत देय राहणार नाही.PUNE NEWS
४०% सवलत लागू असलेल्या मिळकतींना २५% सवलत
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६७ (अ) अन्वये अनधिकृत मिळकतींवर लागू असलेली शास्ती कायम राहील. तसेच भविष्यात महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भात कोणतेही नियम / निकष अधिसूचित झाल्यास ते संबंधित प्रकरणी लागू राहणार आहेत. तसेच ज्या मिळकतींना विद्यमान महापालिका धोरणानुसार ४०% सवलत लागू आहे, त्या मिळकतींसाठी ५०% सवलती ऐवजी केवळ २५% सवलत देण्यात येणार आहे.
PUNE NEWS
