Pune News : रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
Pune News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
2 मिनट पठन

Pune News :पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहराच्या वतीने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. विजय खरे यांचे 'भारतीय संविधानाचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, त्याची रचना आणि इतर देशांच्या संविधानांच्या तुलनेत भारतीय संविधानाचे वेगळेपण व सामर्थ्य याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बाबुराव घाडगे, ख्रिश्चन आघाडीचे शहराध्यक्ष क्रिस्टोपर राजमनी, राखीताई रासकर, अर्जुन अल्हाट, सुधीर जगताप, हनुमंत गायकवाड, शशिकांत मोरे, विनोद टोपे, अविनाश कदम, भारत भोसले, संदीप धांडोरे, रवी अवसरमल, फिरोज खान, निलेश रोकडे, आशिष भोसले, अक्षय अवसरमल, सुनील गवळी, चांदणी गायकवाड, रेश्मा शेख, डोर्थी थॉमस, हर्षदा गायकवाड, स्मिता पोहेकर, मल्लमा कांबळे, नंदाताई निकाळजे, सोनाली निकाळजे, सुयश वाघमारे, सुशील मंडळ, संग्राम साळवे, नारायण गायकवाड, सुभाष शिंदे, सचिन डोळसे, आबा गायकवाड, राजेंद्र गायकवाड, जितेंद्र कांबळे, मिलिंद चलवादी, वसंत ओवाळ, सुनील खुडे, विशाल ओवाळ, रावसाहेब झेंडे, संजय बनसोडे, गोविंद साठे, स्टेनली नाथन, खंडू शिंदे, विकी वाळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper

