मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

Pune News : पुणे: पुणे शहरात दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'नवरात्र उत्सव' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

: नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
: नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

Pune News : चतुःशृंगी माता मंदिर, भवानी माता मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिरांचा परिसर

Pune News : पुणे: पुणे शहरात दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'नवरात्र उत्सव' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील प्रसिद्ध चतुःशृंगी माता मंदिर, भवानी माता मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

महत्त्वाच्या मंदिरांवरील वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग:
भवानी माता मंदिर परिसर: रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅण्ड दरम्यानचा भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दोन्ही बाजूंनी बंद राहील. या मार्गावर नो-पार्किंग घोषित करण्यात आले असून वाहनचालकांनी नेमणूक केलेल्या पार्किंग झोनमध्ये वाहने लावावीत. रामोशी गेटकडून येणाऱ्या बसेसची वाहतूक सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान चौक मार्गे वळवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसर: लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. सकाळ प्रेसकडून जोगेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली असून वाहनचालकांनी सेवासदन चौक, बाजीराव रस्ता आणि आप्पा बळवंत चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच तांबडी जोगेश्वरी, ३३ बुधवार पेठ आणि शनिवार-नारायण पेठेतील काही मंदिरांच्या परिसरात १० दिवसांकरिता पार्किंग बंद राहणार आहे.

चतुःशृंगी माता मंदिर परिसर: सेनापती बापट रोडवर भाविकांची गर्दी वाढल्यास पत्रकार नगर चौकातून येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजी हाऊसिंग चौकातून एकेरी सोडण्यात येईल. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पॉलिटेक्निक मैदान आणि ठरवून दिलेल्या पार्किंग ठिकाणी पार्क करावीत.

सारसबाग महालक्ष्मी मंदिर व श्रीसूक्त/अथर्वशीर्ष पठण: नवरात्रोत्सवानिमित्त १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५ ते ७ या वेळेत महालक्ष्मी मंदिरासमोर महिलांचे एकत्रित श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत जेधे चौक, मित्रमंडळ चौक आणि सिंहगड रस्ता या भागातून सावरकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागरिकांनी व वाहनचालकांनी नवरात्रोत्सवाच्या कालावधीत या बदलांची नोंद घेऊन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें