Pune News : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला
Pune News : अवसरी - रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीला मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली.
1 मिनट पठन

Pune News : पुणे- नाशिक महामार्गावर चाकण येथील किंगफा कंपनीजवळ अपघात
Pune News : अवसरी - रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीला मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी पुणे - नाशिक महामार्गावर चाकण येथील किंगफा कंपनीजवळ घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
या अपघातात राजेंद्र बंडा भोर (वय-४२) आणि त्यांची मुलगी मयूरी राजेंद्र भोर (वय-१४)यांचा मृत्यू झाला. तर वैशाली राजेंद्र भोर (वय-३६) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोर कुटुंबीय मूळचे अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील असून सध्या निरगुडसर येथे वास्तव्यास होते. वैशाली भोर यांचे माहेर मावळ तालुक्यातील मिंडेवाडी येथे आहे. रक्षाबंधनासाठी माहेरी जाण्यासाठी राजेंद्र भोर हे पत्नी वैशाली आणि मुलगी मयूरी यांच्यासह दुचाकीवरून निघाले होते. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी मामाकडे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
