Pune News : गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला नांदेड गावातील स्मशानभूमीच्या पार्किंगजवळ सापळा रचून गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अटक केली.
1 मिनट पठन

Pune News : गुन्हे शाखा युनिट-३ ची नांदेड गावामध्ये कारवाई
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला नांदेड गावातील स्मशानभूमीच्या पार्किंगजवळ सापळा रचून गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीनंतर शस्त्र विकल्याच्या आरोपावरून आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
रोहन सुरेश राठोड (वय २१, रा. नांदेड गाव, पुणे) आणि ओंकार सचिन शिंदे (वय २३, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. २१) करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News
गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रस्ता, नऱ्हे आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अग्निशस्त्रांविरोधात प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्या वेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड गावातील स्मशानभूमीच्या पार्किंगजवळ सापळा रचून राठोडला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दुचाकी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिस्तूल कोठून आणले, याबाबत चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंदे यालाही ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील एका आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहेर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अष्टछळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
