मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा

Pune News : *योजनेअंतर्गत या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा उभारण्याचे नियोजन *तिथे जायला रस्ता बनवण्यासाठी ३८ हजार चौ.मी.

वक
विक्रांत कुलकर्णी

3 मिनट पठन

पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा
पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा

Pune News : तिथे पोहोचण्यासाठी थेट रस्ताच उपलब्ध नसल्याने हा संपूर्ण परिसर वापराविना पडून राहण्याची भीती; कायदेशीर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला


Pune News : *योजनेअंतर्गत या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा उभारण्याचे नियोजन
*तिथे जायला रस्ता बनवण्यासाठी ३८ हजार चौ.मी. खासगी जागा ताब्यात घेण्याची महापालिकेची हालचाल
*संबंधित जागामालकांकडून जमिनी ताब्यात घेण्यासाठी अपेक्षित सहकार्य मिळत नाही
*जागा न मिळाल्यास अनधिकृत बांधकामे होण्याची प्रशासनाला भीती https://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : आम्ही पहिल्यापासून या प्रकल्पाच्या विरोधात आहोत. महापालिकेने कसलेही आणि कोणत्याच प्रकारचे नीट नियोजन केलेले नाही. आता कुठे रस्ता आणि भूसंपादनाचा विषय समोर आला आहे, पुढे अशा अजून अनेक तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी समोर येणार आहेत. विशेष म्हणजे, नदीकाठच्या या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि हरित पट्ट्याचा विकास करणे अपेक्षित असताना, खुली जिम आणि त्यासोबत थेट 'फूड कोर्ट'ची काय गरज आहे? नदीपात्रात आणि नदीकाठी अशा प्रकारची व्यावसायिक किंवा खाद्यपदार्थ केंद्रे उभारल्यास तिथे पुन्हा कचरा, प्रदूषण आणि अस्वच्छता वाढेल." - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच, संस्थापक-अध्यक्षhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे: शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुण्यातील महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा (रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट) उपयोग नागरिकांना होण्यासाठी आता रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रकल्प पूर्णत्वास आला असला तरी तिथे पोहोचण्यासाठी थेट रस्ताच उपलब्ध नसल्याने हा संपूर्ण परिसर वापराविना पडून राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने संगमवाडी ते बंडगार्डन पुलादरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे ३८ हजार ५४२ चौरस मीटर खासगी जागेचे भूसंपादन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे.

मुळा-मुठा नद्यांच्या संगमाजवळ आकर्षक 'घाट’ बांधणार
महापालिकेच्या नदीकाठ विकास योजनेअंतर्गत या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये हरित पट्टा (ग्रीन बेल्ट), सुसज्ज उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि खुली व्यायामशाळा, खाद्यपदार्थ केंद्र (फूड कोर्ट) आणि भव्य वाहनतळ (पार्किंग), संगमवाडी येथील विद्यमान स्मशानभूमीचे नियोजित स्थलांतर आणि मुळा-मुठा नद्यांच्या पवित्र संगमाजवळ आकर्षक ‘कॉनफ्लुएन्स घाट’ विकसित करणे. मात्र, येथे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ३८ हजार चौ.मी. खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महानगरपालिकेकडून हालचाल सुरु आहे.

संबंधित जागामालकांकडून सहकार्य मिळत नाही
या जागेचे संपादन करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असली, तरी संबंधित जागामालकांकडून आवश्यक ती कागदपत्रे देणे आणि जमिनीची मोजणी करून घेणे यासाठी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जागेचा ताबा मिळवण्यात प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जागा ताब्यात न आल्यास प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाची कामे रखडतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच, हा भूखंड मोकळा राहिल्यास तिथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा (डेब्रिज) व कचरा टाकण्याचे प्रमाण वाढेल. एवढेच नव्हे तर या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनधिकृत बांधकामे, मंगल कार्यालये व हॉटेल्स उभारली जाण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

स्थायी समितीसमोर आयुक्तांचा प्रस्ताव
जागामालकांच्या असहकार्यामुळे निर्माण झालेला हा कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी भूमिका घेतली आहे. सन २०२५-२६ च्या रेडीरेकनर दरानुसार या जागेचे एकूण मूल्य सुमारे १७ कोटी ३० लाख रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

ही जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम १२६(२) अन्वये कायदेशीर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.

शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही केवळ रस्त्याअभावी सर्वसामान्यांना या प्रकल्पाचा आनंद घेता येत नव्हता. मात्र, महापालिका प्रशासनाने भूसंपादनाबाबत घेतलेल्या या थेट आणि कठोर भूमिकेमुळे आता कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन जागेचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें