Pune News : एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांवर गुन्हा दाखल
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि राज्य शासनाविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत, विनापरवाना जमाव जमवून नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी १५ विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्रमुख आयोजकांवर विविध गंभीर कलमांतर्गत गु
2 मिनट पठन

Pune News : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि राज्य शासनाविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत, विनापरवाना जमाव जमवून नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी १५ विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्रमुख आयोजकांवर विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागातील पोलीस हवालदार समीर जयराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर घडली. https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद दत्तात्रय पाटील, अक्षय रंगराव कांबळे आणि अनिकेत शंकर देशमाने यांनी २ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी कडक अट व शर्तींच्या अधीन राहून एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करण्याची लेखी परवानगी दिली होती.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधींच्या एका मुख्य शिष्टमंडळाने मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी होणारे आंदोलन स्थगित करत असल्याचे लेखी पत्र पोलीस आयुक्तांना सादर केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्वी दिलेली आंदोलनाची परवानगी अधिकृतपणे रद्द केली होती.
परंतु, शासनाशी सकारात्मक वाटाघाटी पूर्ण होऊन आंदोलन मागे घेतलेले असतानाही, १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:०० वाजता कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कायदेशीर परवानगीशिवाय इंदुलाल कॉम्प्लेक्सबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी अचानक एकत्र जमले.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपपोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांच्या आदेशानुसार शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ अन्वये जमावबंदी व मनाई हुकूम लागू असल्याचे पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून वारंवार स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता तात्काळ निघून जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मात्र, आंदोलकांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत सरकारविरोधी घोषणाबाजी सुरूच ठेवली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी प्रमुख आयोजक आणि प्रतिनिधींवर गुन्हा नोंदवला आहे. प्रमोद दत्तात्रय पाटीलअक्षय रंगराव कांबळेअनिकेत शंकर देश, माने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर, साहेबराव क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
