Pune News : विधानपरिषद निवडणुकीत अर्जांच्या माघारीचा हायव्होल्टेज ड्रामा; पुण्यात महायुती अन् मविआला बंडखोरी शमवण्यात यश!'
Pune News :पुणे :- विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधी राजकीय घडामोडींना वेग आला होता.
1 मिनट पठन

Pune News :भैय्या माने व मंगेश चिवटेंची माघार; भाजपच्या स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्यापुढील अडचणी दूर'
Pune News :पुणे :- विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधी राजकीय घडामोडींना वेग आला होता. पाच जागांसाठी तब्बल 272 उमेदवार रिंगणात असल्याने आणि महायुतीतील घटक पक्षांमध्येच बंडखोरी झाल्याने पक्षांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पुण्यात महायुतीला मोठी यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून आपला अर्ज अखेर मागे घेतला, ज्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
'कार्यकर्त्यांच्या भावनेपोटी अर्ज भरला, पण महायुतीच्या धर्मासाठी माघार' — भैय्या माने
अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भैय्या माने म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या भावनेपोटी आणि वर्षभराज्या मेहनतीमुळे मी अर्ज दाखल केला होता. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मात्र काल मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सुमित कदम यांनी भेटून महायुतीमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून माघार घेण्याचे आवाहन केले. महायुतीचे धोरण आणि नीतिशास्त्र (Ethics) पाळत मी अर्ज मागे घेतला असून, आता मी स्मिता जाधव यांचा प्रचार करणार आहे."
शिक्षक मतदारसंघातही चिवटेंची माघार; मविआत अश्विनी कदम यांनीही घेतला अर्ज मागे
पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी बंडखोरी करत 'एबी फॉर्म'सह अर्ज दाखल केला होता. मात्र, महायुतीच्या वरिष्ठांच्या चर्चेनंतर चिवटे यांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला, ज्यामुळे भाजपचे कौस्तुभ गावडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला (MVA) देखील पुण्यातील बंडखोरी शमवण्यात यश आले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसंगावकर अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आघाडीचा धर्म पाळत अश्विनी कदम यांनीही आपला अर्ज मागे घेतला असून जयंत आसंगावकर आणि हर्षदा देशमुख यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
