मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Metro : मेट्रोच्या अर्धवट कामांमुळे आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune Metro पिंपरी, महाराष्ट्र मिरर : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ( Pune Metro ) मार्गिका-३ हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या टाटा समूहाच्या भागीदारीतील ’पीआयटीसीएमआरएल’च्या हलगर्जी कारभारामुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांसह नागरिका

म
मुबारक

2 मिनट पठन

Pune Metro
Pune Metro

Pune Metro : मेट्रोच्या अर्धवट कामांमुळे आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; ’पीआयटीसीएमआरएल’ची उदासिनता कायम

Pune Metro
पिंपरी, महाराष्ट्र मिरर :
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (Pune Metro) मार्गिका-३ हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या टाटा समूहाच्या भागीदारीतील ’पीआयटीसीएमआरएल’च्या हलगर्जी कारभारामुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.(Pune hinjawadi metro safety issues)

मेट्रो स्थानकांखाली अपूर्ण पदपथ, उघडी चेंबर्स, तुटलेली झाकणे आणि रखडलेली पावसाळी पाणी निचरा वाहिन्यांची कामे यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.(Pune Metro)

माण परिसरातील मेगापोलिस सर्कल, क्वाड्रन सर्कल, डोल्हर कंपनीजवळील मेट्रो स्थानक आणि इन्फोसिस सर्कल परिसरात आजही अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी चेंबर्स उघडी असून काहींची झाकणे तुटलेली आहेत. पदपथ पूर्ण न झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यास ही उघडी चेंबर्स अपघाताचे आणि जीवितहानीचे कारण ठरू शकतात.(Pune Metro)

Pune News: पदोन्नतीनेच होणार रिक्त पदांची भरती; पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ स्तरावर वारंवार आढावा बैठका आणि सूचना देण्यात आल्या, तरीही ’पीआयटीसीएमआरएल’कडून आवश्यक कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. (Pune Metro)

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज हजारो कर्मचारी ये-जा करतात. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या तोंडावर मूलभूत सुरक्षा व्यवस्था अपूर्ण ठेवणे म्हणजे गंभीर निष्काळजीपणा असल्याची टीका होत आहे.

टाटा समूहासारख्या प्रतिष्ठित उद्योगसमूहाच्या भागीदारीतील संस्थेकडून अशा प्रकारचा कारभार होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार का, असा प्रश्न आता आयटी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा: Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! जहांगीर चौक ते मंगलदास चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

वर्ष उलटूनही परिस्थिती जैसे थे

गेल्या वर्षी मुसळधार पावसानंतर हिंजवडी मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मेट्रोच्या खांबांमधील (Pune Metro) दुभाजकांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा रोखला गेला आणि संपूर्ण हिंजवडी आयटी पार्क परिसर अक्षरशः जलमय झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र, वर्षभर उलटूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.

Medha Kulkarni Vat Purnima Controversy: खासदार मेधा कुलकर्णींच्या वटपूजेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले!

शेयर करें