Pune News : माणिकबाग परिसरात घरफोडी; बंद फ्लॅटमधून २.२० लाखांचे सोन्याचे गंठण चोरीला
Pune News : पुणे: सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील एका बंद फ्लॅटच्या कपाटातून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे: सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील एका बंद फ्लॅटच्या कपाटातून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी २४ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० ते २:३० वाजण्याच्या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत घडली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी ५४ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला या माणिकबाग येथील अनमोल अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. त्या कामानिमित्त बाहेर गेल्या असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले २ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (गंठण) चोरून नेले.https://maharashtramirror.com/ Pune News
महिला घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने गायब असल्याचे दिसून आले. आसपास शोध घेऊनही दागिने न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
