Pune News : पुण्यातील लक्ष्मी रोडवर बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग
Pune News :पुणे : शहराच्या अग्निसुरक्षेबाबत महापालिका आयुक्त श्री.
4 मिनट पठन

Pune News :आयुक्तांच्या आदेशानंतरही अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Pune News :पुणे : शहराच्या अग्निसुरक्षेबाबत महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी नुकतेच कडक निर्देश आणि नियमित तपासणीचे आदेश दिले असतानाच, आज वर्दळीच्या लक्ष्मी रोडवरील शगुन चौक परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत अवघ्या एक तासात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.https://maharashtramirror.com/ pune News
आयुक्त नवल किशोर राम यांचे कडक निर्देश आणि कारवाईचा बडगा
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व व्यावसायिक व इतर आस्थापनांनी अनिवार्य अग्निसुरक्षा ऑडीट करून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. नियमांची पूर्तता न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यानंतर, गेल्या आठवडाभरात अग्निशमन दलाने हॉटेल, पीजी (पेइंग गेस्ट), क्लासेस आणि हॉस्पिटल्ससह तब्बल ४१४ आस्थापनांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नोटीसा बजावून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. असे असतानाच आज घडलेल्या या घटनेने व्यावसायिक इमारतांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कशी घडली घटना?
आज सकाळी १०:११ वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक आगीचा प्रकोप झाला. येथील एका एसीने पेट घेतल्यामुळे प्राथमिक स्वरूपात आग भडकली. सुरक्षारक्षकाने अग्निशमन यंत्राच्या (फायर एक्स्टिंग्युशर) साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
सहाव्या मजल्यावरील सुमारे ८०x४८० फुटांच्या हॉलमध्ये प्लायवुडचे पार्टिशन करून चार कार्यालये आणि एक बॅटरी बॅकअप रूम तयार करण्यात आली होती. या आगीत ३ कार्यालयांमधील कॉम्प्युटर, फर्निचर, एसी, इलेक्ट्रिक वायरिंग, प्रिंटर आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतीही स्थायी अग्निसुरक्षा यंत्रणा (फायर फाइटिंग सिस्टीम) आढळून आलेली नाही.
अग्निशमन दलाची तत्परता आणि शर्थीचे प्रयत्न
नियंत्रण कक्षात वर्दी मिळताच मध्यवर्ती, कसबा, एरंडवणा, नायडू आणि कोंढवा केंद्रांमधून ४ फायरगाड्या व ३ वॉटर टँकर अशी एकूण ७ वाहने अवघ्या काही वेळात घटनास्थळी रवाना झाली. लक्ष्मी रोडसारख्या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या परिसरात जवानांसमोर आग विझविण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीस जवानांनी होज पाईप, बीए सेट, रश्शी आणि एक्झॉट ब्लोअरसारख्या अत्याधुनिक साहित्याचा वापर करत अत्यंत वेगाने आगीवर मारा केला.
आग आजूबाजूच्या इमारती किंवा परिसरापर्यंत पसरू न देता जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एक तासात ती पूर्णपणे आटोक्यात आणली. या संकटसमयी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, बांधकाम विभाग, पोलीस दल आणि महावितरणचे पथकही तातडीने उपस्थित होते.
कोट
"बँक ऑफ इंडियामधील आगीची घटना मोठी होती. अधिकारी व जवानांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरत शहरातील लक्ष्मी रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात शर्थीचे प्रयत्न करीत आग इतरत्र पसरू न देता आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला."
पुणे, महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे आणि बांधकाम साहित्याचा ढीग रचणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरोधात पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आपला गांभीर्यपूर्वक बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जवळपास एका दशकापासून अपरिवर्तित राहिलेल्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (जानेवारी ते ऑगस्ट २०२६) महापालिकेने दंडात्मक कारवाईतून तब्बल १.८७ कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा केला आहे.
तरीही नागरिक बेशिस्तच
महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला तरीही शहरातील उघड्यावर कचरा टाकण्याचे आणि अस्वच्छतेचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांवर कडक शिस्तीचा आणि आर्थिक दणक्याचा धाक निर्माण व्हावा, या उद्देशाने महापालिकेने दंडाच्या रचनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहा वर्षांनंतर दंडात्मक नियमांत सुधारणा
सध्या लागू असलेले दंडाचे दर हे 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' अंतर्गत निश्चित करण्यात आले होते. सुमारे १० वर्षे उलटून गेल तरी त्यात कोणताही बदल झाला नव्हता. सध्या सामान्य कचरा टाकणे किंवा अस्वच्छता पसरवल्यास ५०० ते १,००० रुपये दंड आकारला जातो. उघड्यावर कचरा जाळल्यास ५,००० रुपयांपर्यंत तर बांधकामाचा राडारोडा/कचरा टाकल्यास २५,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा दंड अधिक कठोर बनवण्याचा प्रस्ताव मांडला असून, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
८ महिन्यांतील कारवाईचा लेखाजोखा (जानेवारी - ऑगस्ट २०२६ )
कारवाईचा प्रकार एकूण कारवाया वसूल झालेला दंड (रुपयांत)
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ११,४९९ ९०.३६ लाख
उघड्यावर लघुशंका करणे २,८२१ ५.७३ लाख
प्लास्टिकबंदीचे उल्लंघन (३,४१६.९ किलो जप्त) ५९१ ३१.५१ लाख
बांधकाम राडारोडा उघड्यावर टाकणे २५६ ४६.४४ लाख
ओला-सुका कचरा वेगळा न देणे १,००६ २.८४ लाख
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १८८ १.८७ लाख
उघड्यावर कचरा जाळणे ४९ ३.३० लाख
एकूण १६,५३२ १,८७,८२,३२५ रु.
मे महिन्यात सर्वाधिक दंड वसुली
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात सर्वाधिक ३६.७१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजे २,९६३ दंडात्मक पावत्या (चलने) फाडण्यात आल्या.
"केवळ दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे प्राधान्य आहे. दंडाची रक्कम पुरेशी नसल्यामुळे अनेक नागरिक दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करतात. प्रस्तावित दंडवाढीमुळे नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होईल आणि स्वच्छ भारत अभियानात शहराचे मानांकन उंचावण्यास मदत होईल," असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
