मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने सराफाला दीड लाखांचा गंडा

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघांनी सराफाचे लक्ष विचलित करून दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी नेल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने सराफाला दीड लाखांचा गंडा कर्वेनगरमधील दुकानातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने सराफाला दीड लाखांचा गंडा कर्वेनगरमधील दुकानातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime : कर्वेनगरमधील दुकानातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघांनी सराफाचे लक्ष विचलित करून दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी नेल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कर्वेनगरमधील थोरात कॉलनी येथील हर्ष ज्वेलर्समध्ये २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय सराफाने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, विठ्ठल मंदिर रस्त्यावर सुवर्णयुग बँकेसमोरील त्यांच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी संगनमताने खोटे नाव, पत्ता आणि कारण सांगून सराफाचा विश्वास संपादन केला. सोनसाखळी पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी ती सराफाकडून घेतली. त्यानंतर त्यांचे लक्ष विचलित करून नकळत दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. https://maharashtramirror.com/ Pune crime

याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें