Pune News : कर्वेनगर-एरंडवण्यात मिनी फॉरेस्टवर कुऱ्हाड
*करिश्मा सोसायटी रस्त्यालगत आहे निसर्गरम्य 'अर्बन मिनी फॉरेस्ट' *हरित पट्ट्यातून परस्पर 'डीपी रस्ता' काढण्याचा महापालिकेच्या पथ विभागाचा घाट *खासगी मॉल आणि 'वृद्धाश्रम' आरक्षणाच्या जागांमधून वृक्षतोड कोणाच्या भल्यासाठी?
3 मिनट पठन

Pune News : डीपी रस्त्याच्या नावाखाली ४६७ वृक्षांच्या कत्तलीची योजना; पेशवेकालीन विहीर आणि दुर्मिळ झाडे धोक्यात

महत्वाचे मुद्दे
*करिश्मा सोसायटी रस्त्यालगत आहे निसर्गरम्य 'अर्बन मिनी फॉरेस्ट'
*हरित पट्ट्यातून परस्पर 'डीपी रस्ता' काढण्याचा महापालिकेच्या पथ विभागाचा घाट
*खासगी मॉल आणि 'वृद्धाश्रम' आरक्षणाच्या जागांमधून वृक्षतोड कोणाच्या भल्यासाठी? असा नागरिकांचा संतप्त सवाल
*५० वर्षांहून अधिक जुनी झाडे पाडल्यानंतर नागरिकांची पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार
*मंत्रालयातून थेट ईमेल आल्यावरही पालिकेने काम थांबवले नाही
*आणखी ३० झाडे कापली गेल्यावर नागरिकांनी वृक्षतोड बंद पाडली
*वृक्षतोडीची मूळ परवानगी २०२३ मधील, परवानगीची वैधता केवळ ३ महिने
*जुन्या परवानगीवर वारंवार बेकायदेशीर मुदतवाढ देण्यात आली https://maharashtramirror.com/ Pune News
Pune News : पुणे, धनश्री ओतारी
Pune News : कर्वेनगर-एरंडवणे प्रभागातील करिश्मा सोसायटी रस्त्यालगतच्या गल्लीतील (सिद्धार्थ टॉवर्स गल्ली) निसर्गरम्य 'अर्बन मिनी फॉरेस्ट'वर महापालिकेने कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केल्यामुळे कर्वेनगर-एरंडवणे (प्रभाग २९) परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. शेकडो झाडे, अनेक हेरिटेज वृक्ष आणि पेशवेकालीन ऐतिहासिक विहीर असलेल्या या हरित पट्ट्यातून परस्पर 'डीपी रस्ता' काढण्याचा घाट महापालिकेच्या पथ विभागाने घातला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
एका बाजूला खासगी विकासकाचा मॉल आणि दुसऱ्या बाजूला 'वृद्धाश्रम' आरक्षणाची जागा असताना, ही वृक्षतोड कोणाच्या भल्यासाठी केली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
५०-७० दुर्मिळ वृक्ष तोडले
१७ सप्टेंबर रोजी अचानक झाडे कापण्याच्या करवतींचा आवाज आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पालिकेने ४० ते ५० दुर्मिळ आणि ५० वर्षांहून अधिक जुनी झाडे पाडली होती. नागरिकांनी तात्काळ पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार नोंदवली. मंत्रालयातून पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना काम थांबवण्याचे थेट ईमेल आल्यावरही पालिकेने काम थांबवले नाही. रात्रीच्या अंधारात फ्लडलाईट्स लावून छुप्या पद्धतीने तोडकाम सुरूच ठेवले गेले. अखेर संतप्त नागरिकांनी थेट घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले, परंतु तोपर्यंत आणखी २० ते ३० झाडे कापली गेली होती.
परवानगीची वैधता केवळ ३ महिने
धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या ट्री डॉकेटनुसार वृक्षतोडीची मूळ परवानगी २०२३ मधील आहे. 'महाराष्ट्र वृक्ष रक्षण व संवर्धन कायद्या'नुसार परवानगीची वैधता केवळ ३ महिने असते. जनसुनावणी न घेता जुन्या परवानगीवर वारंवार बेकायदेशीर मुदतवाढ देऊन ही कारवाई केली जात आहे. सार्वजनिक जागा असलेल्या या मिनी फॉरेस्टला अचानक बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. हे बॅरिकेड्स पालिकेचे नसून लगतच्या अंडर-कन्स्ट्रक्शन मॉलच्या सुरक्षा रक्षकांचा पहारा येथे कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल येथीन नागरिकांनी उपस्थित केला आहे.
२०० झाडांवर क्रमांक टाकले
तसेच दोन एकर वृद्धाश्रम आरक्षणाच्या जागेतील २०० हून अधिक झाडांवरही क्रमांक टाकण्यात आले आहेत. सार्वजनिक जागेवरील या क्रमांकांमागे कोणाचा हात आहे, याचे उत्तर ना महापालिकेकडे आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागिरकांनी दिली आहे.
या जंगलात चंदन, काळा शिरीष, पांढरा शिरीष आणि पुत्रवती यांसारख्या मौल्यवान देशी प्रजातीची झाडे आहेत. अनेक झाडांवर पक्ष्यांची घरटी असताना तोडकाम करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. तसेच, तोडलेल्या मौल्यवान चंदनाच्या लाकडाचे पालिकेने काय केले? केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगितीचे आदेश आल्यानंतरही आणि संध्याकाळी ६ नंतर वृक्षतोड बेकायदेशीर असतानाही फ्लडलाईट्स लावून रात्रीच्या अंधारात एवढी घाई का केली जात आहे?
रस्ता की मॉलसाठी मार्ग?
स्थानिकांच्या मते, या शांत निवासी भागात कोणत्याही वाहतूक कोंडीची समस्या नाही आणि सर्व बाजूने प्रशस्त रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे या नव्या डीपी रस्त्याची अजिबात गरज नाही. केवळ उभारल्या जाणाऱ्या मॉलला मागच्या बाजूने थेट प्रवेश (Back Access) मिळवून देण्यासाठीच या नैसर्गिक मिनी फॉरेस्टचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
जैवविविधता पार्क उभारण्याची मागणी
स्थानिक आमदारांसोबत आणि माजी नगरसेवकांसोबत बैठका पार पडल्या असल्या तरी प्रशासनाकडून अद्याप ठोस आणि समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. "वृद्धाश्रमाच्या नावाखाली ही जमीन कोणाच्या घशात घातली जाणार आहे याचा आधी खुलासा व्हावा. हे मिनी फॉरेस्ट नष्ट करण्याऐवजी वृद्धाश्रमाच्या आरक्षणासह संपूर्ण जागेचे रूपांतर वॉकिंग ट्रॅक असलेल्या सुंदर 'जैवविविधता पार्कमध्ये' करावे," अशी एकमुखी मागणी आता रहिवाशांनी लावून धरली आहे.
