मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : गरुड, सोनवणे, कोंडे, भिंगारकर विजेते

Pune News पुणे - अखिल भारतीय कराओके गायक परिषद(महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सभासदांसाठीच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा पॉलिसीचे आणि सभासद ओळखपत्राचे वाटप तसेच सुमधुर गीतांची बहारदार संगीत संध्या शिवाजीनगर येथील संत माई सभागृहात उत्साहा

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

गरुड, सोनवणे, कोंडे, भिंगारकर विजेते
गरुड, सोनवणे, कोंडे, भिंगारकर विजेते

Pune News पुणे - अखिल भारतीय कराओके गायक परिषद(महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सभासदांसाठीच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा पॉलिसीचे आणि सभासद ओळखपत्राचे वाटप तसेच सुमधुर गीतांची बहारदार संगीत संध्या शिवाजीनगर येथील संत माई सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,रामराज्य को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष शिरीष मोहिते,जनदिप चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, राष्ट्रवादी पक्ष कसबा मतदार संघाचे अजय दराडे यांच्या हस्ते परिषदेने कलाकार सभासदांसाठी आयोजित केलेल्या गणपती गौरी सजावट स्पर्धेतल्या विजेत्यांना तसेच सभासदांना ओळखपत्र आणि अपघाती विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप ढमाले, उपाध्यक्षा गीता मोहिते पाटील (कोसंदर), प्रमुख कार्यवाहक उदय पारखी, कोषाध्यक्ष रोहिणी मानकर, प्रसिद्धी प्रमुख करुणा पाटील आणि कार्यकारिणी सदस्य संजीव रासकर, माधुरी रासकर, नीता ढमाले उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष अशोक जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात परिषदेच्या कार्याची माहिती सांगितली. त्या नंतर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गौरी-गणपती आरास स्पर्धेचा' निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या स्पर्धेत स्पर्धकांनी आकर्षक व कल्पक सजावट केली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत गजानन गरुड, अल्पना सोनवणे आणि नंदकुमार कोंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. गणपती आरास स्पर्धेत सुनीता भिंगारकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. प्रातिनिधिक स्वरूपात आशा सारोळकर, गणेश तरंगे, नंदू कुदळे, चंद्रशेखर चव्हाण,राजेंद्र चव्हाण, अनिल घाडगे, सुचेता शुक्ल, बाबुराव सुगंधी, प्रकाश झोडगे, विलास गाधडे या ज्येष्ठ सभासदांना संस्थेकडून अपघाती विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या सभासद गायकांनी साठ ते नव्वद दशकातील लोकप्रिय हिंदी मराठी एकल आणि द्वंद्व गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पारखी आणि रोहिणी मानकर यांनी केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें