मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : पुण्यात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना अटक; ११२ ग्रॅम अमली पदार्थांसह ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime :पुणे: पुणे शहरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, काळेपडळ परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुण्यात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना अटक;११२ ग्रॅम अमली पदार्थांसह ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना अटक;११२ ग्रॅम अमली पदार्थांसह ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime :काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; दोन मोबाइल आणि दुचाकीही जप्त

Pune Crime :पुणे: पुणे शहरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, काळेपडळ परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. मुशरफ इसाक शेख (वय २५) आणि सोहेल बाबूलाल शेख (वय २५, दोघेही रा. काळेपडळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी अमली पदार्थविरोधी पथक क्रमांक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि त्यांचे सहकारी पुणे शहराच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी चौक रस्त्यालगत रेल्वेच्या संरक्षक भिंतीजवळ दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाल करताना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची ओळख पटली. त्यानंतर दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

आरोपी मुशरफ शेख याच्याकडे ५१ ग्रॅम ८३ मिलीग्रॅम, तर सोहेल शेख याच्याकडे ५९ ग्रॅम ६१ मिलीग्रॅम एमडी आढळले. अशा प्रकारे एकूण १११ ग्रॅम ४४० मिलीग्रॅम (अंदाजे १११.४४ ग्रॅम) अमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल फोन आणि ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख १४ हजार ३२० रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल सरडे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ (एनडीपीएस) कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त हसन गौहर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहभागी पोलिस पथक : वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक आशा भिंगारे, पोलिस हवालदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, निलेश जाधव, अमोल सरडे, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, किरण जाधव, अमर लोणकर, अविनाश रेडके, आशा भिलारे, प्रेम धारूरकर, तसेच पोलिस अंमलदार मंगेश गुंड, अक्षय शिर्के आणि संदीप शिर्के.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें