मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : गणेशोत्सवातील दागिनेचोरीचे तेरा गुन्हे उघड; एक ताब्यात

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या सोनसाखळ्या आणि मंगळसूत्रे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकाला ताब्यात घेऊन १३ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

गणेशोत्सवातील दागिनेचोरीचे तेरा गुन्हे उघड; एक ताब्यात
गणेशोत्सवातील दागिनेचोरीचे तेरा गुन्हे उघड; एक ताब्यात

Pune News : फरासखाना पोलिसांचा उत्तर प्रदेशात तपास; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या सोनसाखळ्या आणि मंगळसूत्रे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकाला ताब्यात घेऊन १३ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. या तपासात १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांच्या माहितीनुसार, सागर कोमटी हे मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील बेलबाग चौकाजवळ विसर्जन मिरवणूक पाहत होते. त्या वेळी सहा अनोळखी व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या खिशातील मोबाईल काढला. इतरांनी त्यांना पकडून मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखविला. लोखंडी कटरने त्यांच्या गळ्यातील ३८.३२० ग्रॅम वजनाची सोनसाखळी कापून हिसकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांना हा गुन्हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून विजयपाल कवर सैन (वय ३४, रा. इस्लामपूर घसौली, जि. शामली, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी केलेल्या चौकशीत त्याने पाच साथीदारांसह हा गुन्हा आणि अन्य गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला आणि मुद्देमाल हस्तगत केला. दाखल गुन्ह्यासह सोनसाखळी व मंगळसूत्र चोरीचे आणखी १२, असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि राजेश महाला यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, इरफान मोमीन, गजानन सोनुने, चेतन होळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें