Pune News : गणेशोत्सवातील डीजेच्या विरोधात पुणेकरांचा एल्गार
Pune News : पुणे, धनश्री ओतारी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात डीजेच्या दणदणाटाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
4 मिनट पठन

Pune News : पुणे, धनश्री ओतारी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात डीजेच्या दणदणाटाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, पुणेकरांनी आता थेट ऑनलाइन मंचाचा आधार घेतला आहे. ‘चेंज डॉट ऑर्ग’ या व्यासपीठावर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला अवघ्या दोन दिवसांतच २३ हजारांहून अधिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला असून, सार्वजनिक गणेशोत्सवात डिजे आणि उच्च डेसिबलच्या साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीजेबद्दल भूमिका स्पष्ट केली असून पुण्यात गणेशोत्सवामध्ये डीजे लावायचा की नाही? किती बेसला परवानगी? याचा मोठा निर्णय घेतला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराज
सोमवारी पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उत्सवादरम्यान डीजेच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय एकमुखाने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, डीजेला विरोध करणाऱ्या काही नागरिकांना बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News
सोलापूरने घालून दिले उदाहरण
शेजारील सोलापूर जिल्ह्यात यंदा डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिथे त्याचे काटेकोर पालन होत आहे. सोलापूरमध्ये जर शांततापूर्ण वातावरणात उत्सव पार पडू शकतो, तर मग पुण्यात प्रशासनाला हा नियम का लागू करता येत नाही, असा सवाल पुणेकर विचारत आहेत. महापालिकेच्या बैठकीत नागरिकांना आपला आवाज दाबल्याबद्दलही तीव्र निराशा व्यक्त होत आहे. सुरुवातीला डीजेच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या महापौरांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन याचिकेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षवेधी ठरला आहे. अवघ्या ४८ तासांत २२ ते २३ हजारांहून अधिक नागरिकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या करून डीजेच्या विळख्यात अडकलेल्या उत्सवाविरोधात आवाज उठवला आहे. हा प्रश्न आता केवळ गणेश मंडळे किंवा प्रशासनापुरتا मर्यादित न राहता, संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याशी आणि शांततेशी जोडला गेला आहे. कर्णकर्कश आवाज, त्यामुळे त्रस्त होणारी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांची हेळसांड या मुद्द्यांवर आता तीव्र सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय
"प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे सण उत्सव साजरे करणे अनिवार्य आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या यंत्रांचे डेसिबल खूप जास्त आहेत हे निदर्शनास आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात याबाबत टेस्टिंग सुद्धा झाली. गणेश मंडळांकडून सुद्धा प्लाझ्मा, प्रेशर मिड, लेसर या गोष्टी वापरल्या जाणार नाहीत याबाबत चर्चा झालेली आहे," अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. https://maharashtramirror.com/ Pune News
४ बेस आणि ४ टॉप वापरणार, मंडळाकडून शब्द
तसेच, गणेशोत्सवामध्ये किती बेस, किती टॉप याबद्दल विविध मागण्या होते आहेत. त्याबद्दल आता ४ बेस, ४ टॉप विसर्जन मिरवणुकीत वापरले जातील यापेक्षा जास्त कोणी वापरणार नाही, असे गणेश मंडळानी सांगितलं आहे. त्याबद्दल विचार विनिमय सुरू आहे. मोकळ्या जागेत जिथे स्थिर कार्यक्रम आहेत, तिथे ६ बेस, ६ टॉप लावण्यासाठी काही मंडळांचा आग्रह आहे, त्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केलं.
नाना पेठेत निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांची मोठी कारवाई
बुधवारी झालेल्या मिरवणुकांदरम्यान शहरात एक हजारहून अधिक ठिकाणी आवाजाची नोंद करण्यात आली. त्यापैकी तब्बल १४८ ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आवाज आढळून आला. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटर आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिरवणुकीत ६ ठिकाणी प्लाझ्मा आणि प्रेशर मिड वापरण्यात आला त्यामुळे सगळी साउंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे. १००० पेक्षा जास्त चाचण्या आवाजाच्या काल घेतल्या. १४८ ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल ऐकू आला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे बजावलं.
ढोल-ताशाबद्दल सुद्धा अनेक तक्रारी
ढोल-ताशाबद्दल सुद्धा अनेक तक्रारी येत आहेत. त्यांच्याकडून सुरू असलेला सरावाबद्दल तक्रारी आहेत. विसर्जन मिरवणुकीत किती ढोल ताशा पथकं लावायचे याबद्दल लवकर निर्णय होईल. १८० ते १९० मंडळाशी जे लक्ष्मी रोड वरून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात त्यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे. लक्ष्मी रोड, टिळक रोड वर गर्दी नियंत्रणा शिवाय गणेश मंडळांना सहजपणे पुढे जाता येईल, असे आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं.
चेंज डॉट ऑर्ग’ या व्यासपीठावर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला अवघ्या दोन दिवसांतच दिला २३ हजारांहून अधिक नागरिकांनी पाठिंबा
पुण्यात गणेशोत्सवामध्ये डीजे लावायचा की नाही? किती बेसला परवानगी? पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
गणेशोत्सवात डिजे आणि उच्च डेसिबलच्या साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची जोरदार मागणी
हा प्रश्न आता केवळ गणेश मंडळे किंवा प्रशासनापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याशी आणि शांततेशी जोडला गेला आहे
आता ४ बेस, ४ टॉप विसर्जन मिरवणुकीत वापरले जातील, यापेक्षा जास्त कोणी वापरणार नाही, असे गणेश मंडळानी सांगितले आहे
ढोल-ताशाबद्दल सुद्धा अनेक तक्रारी येत आहेत; त्यांच्याकडून सुरू असलेला सरावाबद्दल तक्रारी आहेत
विसर्जन मिरवणुकीत किती ढोल ताशा पथके लावायची याबद्दल लवकर निर्णय होईल
"प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे सण उत्सव साजरे करणे अनिवार्य आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या यंत्रांचे डेसिबल खूप जास्त आहेत हे निदर्शनास आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात याबाबत टेस्टिंग सुद्धा झाली. गणेश मंडळांकडून सुद्धा प्लाझ्मा, प्रेशर मिड, लेसर या गोष्टी वापरल्या जाणार नाहीत याबाबत चर्चा झालेली आहे." - - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
