मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुण्यात FDA ची धडक कारवाई! विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापनांना टाळे ठोकण्याचे आदेश; स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई

Pune News :पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पुण्यात FDA ची धडक कारवाई! विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापनांना टाळे ठोकण्याचे आदेश; स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई
पुण्यात FDA ची धडक कारवाई! विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापनांना टाळे ठोकण्याचे आदेश; स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई

Pune News :पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ९ आणि १० ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत विनापरवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापनांवर कारवाई
FDA च्या तपासणीत आवश्यक परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळलेल्या चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये पुण्यातील कॅम्प परिसरातील गार्डन वडापाव सेंटर, पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील बालाजी साउथ इंडियन फूड, रहाटणी येथील इंजिनिअर वडेवाले अँड थाळी आणि जी. के. हॉटेल, युअर हेज यांचा समावेश आहे.

स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; तीन आस्थापनांवर कारवाई
दरम्यान, अन्नपदार्थ तयार करताना आणि विक्री करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी FDA ने आणखी तीन आस्थापनांवर कारवाई केली. यामध्ये लोहगाव येथील पंजाबी ढाबा, कोंढवा खुर्द येथील खान-ए-खास हॉटेल आणि देवाची उरुळी येथील हॉटेल सोनाई यांचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याने प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली.

अन्न व्यवसायासाठी नियमांचे पालन बंधनकारक
अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी असणे तसेच अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्री करताना स्वच्छतेचे निकष पाळणे बंधनकारक आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाकडून अशा आस्थापनांची तपासणी केली जाते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आवश्यक परवाने, नोंदणी आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें